झब्बू - ३

मला चहामध्ये बिस्कीटं बुडवताना पाहून
माझे तलम मित्र मला म्हणाले रागावून
हे कसले चाळे करतोस?
कुठल्या काळात जगतोस?

हल्ली आईस-टी आणि लेमन-टी मिळतो
बिस्कीटं आणि टोस्ट आमचा कुत्रा चघळतो!


इतकं ऐकेपर्यंत बिस्कीट अर्धं ओलं झालं
कपामध्ये चहाच्या अगदी सचैल न्हालं

स्ट्रॉ आणि आईस-टीशी तर संबंधही नाही लांबचा
बिस्कीट काढून खायला मला हवाय एक चमचा!