मुक्तक आणि गजल

मुक्तक


नेहमी मी का चुकीचे वागतो?
नेहमी मी का मनाचे ऐकतो?
ऐकले नाही तुझे मी सांगणे
आजतो याची फळे मी भोगतो...


गजल


माझ्याशी मी बोलत बसतो
मनात गाणे ऐकत बसतो...


वाऱ्यासंगे सूर गवसले
मी तंबोरे जुळवत बसतो...


झालो आहे एकलकोंडा
सर्वांना मी टाळत बसतो...


कुणीच नसते येणारे पण-
वाट कुणाची पाहत बसतो?...


आयुष्याचा अर्थ न कळला
गूढ कशाचे उकलत बसतो?...


बालिश असले 'अजब' तरीही
हट्ट मनाचे पुरवत बसतो...