बोलायला मला

येते असेच तुजला फसवायला मला
जमते मधूर म्हणुनी बोलायला मला

ठेवून कोण गेली माझ्या कुशीत हे?
(झाला उशीर तेही लपवायला मला)

असतो कधी इथे मी, असतो कधी तिथे
आहेच कोण येथे समजायला मला?

मी रात्र का उगीचच झोपून काढली?
नाही कुणी सकाळी उठवायला मला!

टाळायचे जयांना ते भेटले मला!
आले कुणीच नाही सांगायला मला!

हातात हात मजला तू दे जरा गडे  
येतेच काय दुसरे बोलायला मला?