नैवेद्य

सोयीनुसार आपल्या देवास मानता तुम्ही
पाहून स्वार्थ आपला धर्मास जागता तुम्ही


आताच कशी फुटली वाचा ही मंदिरांना
कुठला जुना पुराणा इतिहास सांगता तुम्ही


ठेवा जपून आता तुमची गाथा पुराणे
दाखवून मोक्ष येथे आत्म्यास भोगता तुम्ही


सांगू नका मला हे थोतांड काजव्यांनो
उगवताच सूर्य येथे चळचळा कापता तुम्ही


कित्येक लोक दारी अन्नानं करून मेले
नैवेद्य मात्र येथे दगडास दाखवता तुम्ही


                          - अनिरुद्ध अभ्यंकर