पावाचा चिवडा

  • १ पुडा पाव (ब्रेड)
  • फोडणीचे सर्व साहित्य (कमीत कमी तेल, मोहरी/जिरे, हळद, हिंग, धन्याची पूड)
  • एक चमचा तिखट
  • अर्धा चमचा मीठ
  • चिमूटभर साखर (ऐच्छिक)
१५ मिनिटे
२ माणसांचा पोटभर नाश्ता

ही अगदी साधी पाककृती आहे. आपल्याला उत्तम फोडणी करता येणे एवढेच कौशल्य आवश्यक आहे.

पातेल्यात अथवा कढईत मध्यम शेगडीवर फोडणी करावी.

फोडणी होत असताना पाव कुस्करून त्याचे छोटे छोटे (१सेमी * १सेमी) तुकडे करावे.

फोडणी झाली की त्यात हे सर्व तुकडे घालावेत.
चवीप्रमाणे तिखट मीठ (उदा० एक चमचा तिखट, अर्धा चमचा मीठ इत्यादी) आणि आवडत असल्यास चिमूटभर साखर घालावी. सुमारे पाच मिनिटे परतले की पावाचा चिवडा तयार.

पाव सर्वत्र उपलब्ध असतो आणि ह्या कृतीस पाव थोडा शिळा असला तरी चालतो. घाई असेल तर अतिशय कमी वेळात तयार होणारा हा पदार्थ करता येईल. तसेच छोट्या प्रवासात हा कोरडा पदार्थ आपल्याबरोबर बाळगणे आणि खाणे सोपे होते.

ह्यात आपल्याला कांदा, कोथिंबीर, लिंबू किंवा इतर तत्सम पदार्थ घालून अधिक रुचकर करता येईल.

आपला
(सोपा) प्रवासी