ढेकणापरी मज, माझ्यावर चिडणारे

ढेकणापरी मज, माझ्यावर चिडणारे
आहेत कितीक अंगाला चावणारे

वाटले पहा घेतील भरारी आता!
पेंग्विन कधी पाहिले का रे उडणारे?


घेतला नाही आम्ही धडा अजुनीही
आलेत भेटाया चिनी चिवचिवणारे

सावकाश गेले ते कासव वाटेने 
का  हारले बरे ससे पुढे पळणारे?

उत्तुंग डवरल्या संगणकाच्या बागा
आले कळफलक किती हे टकटकणारे

का उगा आणसी फेनफुलांची मस्ती?
वादळ नसे साथीला घोंघावणारे

तक्रार नित्य  का असते ही कर्त्याची?
घरचेच बिलंदर, सारे मज, छळणारे!

चढतेच आहे पहा पुराचे पाणी
छप्पर फाटले नुसते थडथडणारे!

लिहीताना कारकुनाला चिंता राहे
" येतील ना पण इथे कुणी वाचणारे?"

- कारकून


माझी प्रेरणा चित्त ह्यांची गझल- चंदनापरी मज, माझ्यावर जळणारे