गजल मनाशी जुळते आहे...

गजल मनाशी जुळते आहे
सतत मनाला छळते आहे...


तुला न कळले माझे म्हणणे
मला तरि कुठे कळते आहे?...


पुन: नव्याने उजाडले की
आधीचे मावळते आहे?...


पत्र असावे तुझेच, किंवा-
अक्षर मिळते-जुळते आहे...


तुझ्याकडे यायला निघालो
पुढे-पुढे मन पळते आहे...