आठवा मला

खोडसाळ हे खडे टाकणे पुन्हा पुन्हा
शोभते तुला न हे वागणे पुन्हा पुन्हा

रोज भेट द्यायचा का मला उगाच तू
देत वेगवेगळी कारणे पुन्हा पुन्हा?

रोखले किती जरी, रोज जागवायचे
त्यामुळे हलायचे पाळणे पुन्हा पुन्हा

सूतिकागृहात मी त्रास सोसला किती
अन तरी तुझ्यावरी भाळणे पुन्हा पुन्हा

खेळणी जिथे तिथे, बाहुल्या किती पहा
लेकुरांस त्रासुनी मारणे पुन्हा पुन्हा

खेप ही अखेरची ठरवणे पुन्हा पुन्हा
आठवा मला तरी लागणे पुन्हा पुन्हा



आमची प्रेरणा - स्नेहदर्शन ह्यांची गझल आठवे मला