गज़ल लिहिण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न. एवढे दिवस मनोगतावर गज़ला वाचून वाचून जितके नियम लक्षात आले त्यानुसार मी लिहिण्याचा प्रयत्न केला. तरी मनोगती जाणकारांनी सुधारणा (आणि शीर्षक सुद्धा!)सुचवणे अशी विनंती...
तिच्या डोळ्यात हरवून
डोळ्यांपलीकडे बघत होतो
बघता बघता आणखी खोलवर
भविष्याची चित्रे रंगवत होतो
हातामध्ये हात गुंफून
दूर कुठेतरी चाललो होतो
मायेत तिच्या शरीराच्या
दूरवर कुठेतरी वहात होतो
जीवनातली इच्छा अपुरी
मनामध्ये विरघळवत होतो
'ग्रामिण' मी निःशब्द, निशांत होऊन
दिगंतात विलीन होत होतो