तू टाळलेस कारे

तू टाळलेस कारे
झाले उदास वारे


गाऊ नको पुन्हा तू
थंडावले निखारे


गर्दीत माणसांच्या
शोधू कुठे मलारे


माझे तुझे जमेना
ही ओढ खास कारे?


दाटून प्राण येतो
भेटून जात जा रे