मी कुठे पडलोच तर...

अमची प्रेरणा वैभव यांची सु रे ख गझल  मी कुठे दिसलोच तर


मी कुठे पडलोच तर उठवा मलाही
झोपलो असलोच तर हलवा मलाही


मी घराचा ठेवतो पत्ता खिशात
चार नंबर बसमध्ये बसवा मलाही


उतरली दारू की बरोबर मार्ग कळतो
रोजचाच हा समजा चकवा मलाही


जा जरा लवकर थोडे आणा पाणी
शिंपडा जरा किंवा भिजवा मलाही


काय म्हणता? ती मला स्मरते अजूनी?
लवकर कोठेतरी लपवा मलाही


विडंबन लिहूनी जातो आता मी
प्रतिसाद त्यांस तुमचा कळवा मलाही


मी कशाला बोलण्याचे दुःख: मानू?
शब्द तुमचे सत्कार चिडवा मलाही

 - अनिरुद्ध अभ्यंकर