गाढवे..

आमची प्रेरणा मिलिंदरावांची आसवे


इतके नको रेकू येतील गाढवे
घेऊ नकोस ताना जमतील गाढवे


सांभाळ, पंचविशीचे वय लागले तुला
सगळीच भोवताली दिसतील गाढवे


नेऊ नकोस त्यांना बागेत मोगऱ्याच्या
बागेस ही उकिरडा करतील गाढवे


वाहतात मडक्यांना दररोज जी तुझ्या
माझे कधी दगड मग नेतील गाढवे


राही ना कधीही ते एका ठिकाणी
गावातले उकिरडे फुंकतील गाढवे


ठरले कधीच नाही बापाचे मुलाचे
ओझे कुणाकुणाचे वाहतील गाढवे


त्यांच्यात मैत्रीचे हे शब्द कोरडे
लाथेत स्निग्ध माया भरतील गाढवे


प्रत्येक गर्दभ येते फुंकण्या उकिरडा
तुमच्या परी कधी ना नटतील गाढवे


माझ्या विडंबनाची कीर्ती सुमार येथे
"केशवसुमार" आला म्हणतील गाढवे


- केशवसुमार.