नमस्ते सद्दाम हुसेन

२००२-२००३ या वर्षांत तत्कालीन पेट्रोलियम मंत्री राम नाईक इराकच्या दौऱ्यावर असतांना इराकचे राष्ट्रप्रमुख सद्दाम हुसेन यांनी रामनाईकांच्या 'नमस्ते'ला प्रतिसाद म्हणून हिंदू पद्धतीने हात जोडून अभिवादन केले. त्यावेळच्या प्रमुख वृत्तपत्रांत ही बातमी सद्दाम हुसेन यांना हात जोडलेल्या अवस्थेंत दाखवणाऱ्या फोटोसहित प्रसिद्ध झाली होती. यांतून सद्दाम हुसेन यांनी भेटायला आलेल्या व्यक्तीच्या संस्कृतीबद्दल आपल्याला आदर आहे हे व्यक्त केले. तसे करण्यांत त्यांना कमीपणा वाटला नाही की आपण धर्माज्ञेचे उल्लंघन करीत आहोत असेही वाटले नाही. इतर बिगर- हिंदू राष्ट्रप्रमुखाने सद्दाम हुसेनप्रमाणे केले असते की नाही सांगता येत नाही. मात्र, पाकिस्तानचे राष्ट्रप्रमुख तसे कधीही करणार नाहीत हे नक्की. 


एका 'नमस्ते'ने सद्दाम हुसेन यांनी माझ्यासारख्या अनेक हिंदूंची मने जिंकली असतील. त्यांना सद्दाम हुसेन यांना फाशी व्हायला नको होती असे आजही वाटत असेल.


सद्दाम हुसेन यांना मरणोत्तर नमस्ते. त्यांच्या आत्म्यास शांति लाभो.