तुला सांगतो......

आमची प्रेरणा प्रसाद यांची कविता तुला सांगतो भगवंता

तुम्हा सांगतो प्रशासकाचे हे वागणे असू नये
त्यास लिखाण माझे दिसते, इतरांना का दिसू नये?


शब्द वावगे काढूनी घे वा 'आपापसात' टाक
अंतरजालाच्या विश्वामध्ये लिखाण कापत बसू नये


येईल अता जाग मालका होईल सर्व पूर्वीचे
अशा ह्या नाजूक वेळेला मनोगतींनी रुसू नये


मनोगतींना हसवती विडंबक हे आवली सारे
प्रशासकीय बडग्याला असल्या कोणीही हसू नये


ज्याला काळजी प्रतिसादाची तो लाचार खरा
टीका ज्याला असे नकोशी 'जमीन' त्याने कसू नये


वैर तुझे निर्मात्याशी वा वैर तुझे या कवनांशी?
वार करावा थेट उरावर, 'व्यनिमधूनी डसू नये..


ह्या असल्या लिखाणाने गाठ प्रशासकांची पडली
गोड बोलणे ऐकून त्याचे पुन्हा "केशवा" दिसू नये


केशवसुमार