लढाई ..(गझल)-२

आमची प्रेरणा जयंतरावांची लढाई..(गझ्ल)

कमरेस दाखवी जी सलवार पाहतो मी
रुढी परंपरा ह्या बेकार पाहतो मी

जी काल बाग होती, ती आज प्रणयभूमी
बाकांवरी इथेहा  शृंगार पाहतो मी

'तुटलाय' हात डावा,कोणी 'तयार' नाही!
धुण्यास आज मजला लाचार पाहतो मी

प्रतिसाद लाटण्याची चालू बघा लढाई
त्या सर्व लेखकांचा बाजार पाहतो मी

इतिहास "केशवा"चा सांगू नका मला हो
त्याच्या विडंबने जग 'बेजार' पाहतो मी

केशवसुमार...