मुक्तक - मी जिला माझी म्हणालो ती कुणा दुसऱ्याच पुरुषावर म्हणे आसक्त आहे

मी जिला माझी म्हणालो ती कुणा दुसऱ्याच पुरुषावर म्हणे आसक्त आहे
तो तरी कोठे तिच्यावर प्रेम करतो तीच त्याची एकतर्फी भक्त आहे 
आणि त्यातच घोळ म्हणजे माझिया प्रेमात आहे ही कुणी भलतीच बाई 
मूर्ख ती अन मूर्ख तो अन मूर्ख ही अन मूर्ख मी अन मूर्ख हा प्राजक्त आहे

- माफी

(एका संस्कृत सुभाषिताचा स्वैर अनुवाद)