मनाने ह्या कसे आसावल्या स्वप्नालयी नेले

मनाने ह्या कसे आसावल्या स्वप्नालयी नेले?
तनाला त्याच धक्क्याने पहा देवालयी नेले!

मुलीं त्या अप्सरा झाल्या, मुले गंधर्वही झाले
असे कित्येकदा मीही मला इंद्रालयी नेले

जसा आतूर होऊनी तुला भेटायला आलो
कसे ह्या दुष्ट खड्ड्याने मला रूग्णालयी नेले..

बयेने सोडले कोणा ..फरक इतकाच केला की
कुणा मद्यालयी नेले कुणा मंत्रालयी नेले

कशी फिर्याद नाही.. कोण गुन्हेगार माफीचा?
गुन्हे ऐसेच त्यांनी कोणत्या न्यायालयी नेले?
- कारकून
आधारित माफीचा साक्षीदार -  शरीराने मला जेव्हा जरा रूग्णालयी नेले