पडके झाले बाबांचे घर

प्रेरणास्थान : माफीचा साक्षीदार ह्यांची कुटुंबवत्सल कविता परके झाले बाबांचे घर

पडके झाले बाबांचे घर
सासरलाही लागे घरघर

सासू गेली, श्वशुर वारले
दीरनणंदा जातिल लवकर

छप्पर गळके, घरभर उंदिर
सुस्त मांजरी गाभण त्यावर

दिवसा-रात्री ढोसून असतो
घोरत माझा पतिपरमेश्वर

जवळ कधी ना घेई मजला
ऐसा कसला माझा हा नर?

विहिरीवरती पाटील खुणवी
आधी चिडले, भुलले नंतर