तुला गणपती ...

"तुला गणपती, दोन बायका रिद्धीसिद्धी
आम्हाला मग एकच का रे?

तुला गणपती, मोदक मिळती एकवीस हे
आम्हाला मग चारच का रे?

तुला गणपती, हात चार हे गुटगुटीतसे
आम्हाला मग दोनच का रे?

तुला गणपती, स्त्रिया वाहती फुलेअक्षता
आम्हाला मग जोडे का रे?

तुला गणपती, खेळायाला पूर्ण हिमालय
आम्हाला मग गल्ली का रे?

तुला गणपती, स्वतंत्र वाहन भटकायाला
आम्हाला मग लोकल का रे?"

"मला बालका, दरवर्षी पाण्यात बुडवता
तुम्हाला मग बुडवू का रे?"

- माफी