(दाढ-दिवस)

आमची प्रेरणा अनिरुद्धरावांची वास्तववादी कविता वाढदिवस

दाढ-दिवस
प्रथम
मिळालेल्या कवळीची
नोंद
नंतर
गेलेल्या दातांची (आणि पैशांचीही!)
गिनती

दाढ-दिवस
प्रथम
मिळालेल्या दाढांचा
आनंद
नंतर
गेलेल्या दाढा जातानाचं
दुःख

दाढ-दिवस
प्रथम
खाल्लेल्या मिठाईची
आठवण
नंतर
जवळ येण्याऱ्या दंतवैद्याच्या अपॉईंटमेंटची
चाहूल

--अदिती
(१.३.२००७)