माझ्या मनची गंगा आणि तुझ्या मनच्या यमुनेचा

माझ्या मनची गंगा आणि तुझ्या मनच्या यमुनेचा

माझ्या मनची गंगा आणि तुझ्या मनच्या यमुनेचा
बोल राधे बोल संगम होईल की नाही? नाही, मुळीच नाही!

शतके इतकी वाहून गेली, हाय तुला समजवतांना
माझ्यागत कुणी धैर्यधर असा ह्या जगती आहे का दुजा
ओझे वाढते मनचे कधी कमी होईल की नाही
बोल राधे बोल संगम होईल की नाही? जा जा!

दोन नद्यांचा संगम जर इतका पावन गणल्या जातो
का न जिथे मिळती हृदये दो, स्वर्ग तिथे मग अवतरी तो
पाझरतो पत्थरही, मन तव द्रवेल की नाही
बोल राधे बोल संगम होईल की नाही? उँहू!

तुझ्यासाठी मी तळमळतो जणू धरती वर्षेसाठी झुरे
राधा राधा हाच ध्यास जणू श्वासाश्वासातून वसे
हरऋतू गमतो प्रीतीऋतू असे होईल की नाही
बोल राधे बोल संगम होईल की नाही? जा ना, का सतावता! होईल, होईल!!

मराठी अनुवाद: नरेंद्र गोळे २००७०३१४

'मेरे मन की गंगा और तेरे मन की जमुना का'
ह्या मूळ हिंदी गीताचा भावानुवाद, 'टवाळां'च्या प्रेरणेने
मूळ हिंदी गीतकार: शैलेंद्र, संगीत: शंकर जयकिसन, गायक: मुकेश
चित्रपट: संगम, साल: १९६४, भूमिका: राज कपूर, वैजयंतीमाला, राजेंद्र कुमार