आमची प्रेरणा वैभव जोशी यांनी मायबोलीवर घेतलेल्या कार्यशाळेत मीनु यांनी लिहीलेली तरही गज़ल मनोगतावरच्या रसिकांसाठी ...
ऋतू येत होते, ऋतू जात होते ..
अता बोलणे फक्त स्पर्शात होते ..
कुणी बेवडा गात जातो भसाडा ..
शिव्या फक्त देण्या जणू रात होते ..
घरी एकटी ती, असावे सवे मी ..
असे नेहमी फक्त स्वप्नात होते ..
मनी चाललेले तुझ्या जाणतो मी ..
सुरू खेळ सारे इशाऱ्यात होते ..
दुकाने सुरेची, भले बंद केली ..
तरी आमची सोय गुत्यात होते ..
मला वाटले फास बसला गळ्याला ..
करांचे तिच्या हार कंठात होते ..
सुरू श्वास नाही अधी दाखला द्या ..
म्हणे चैकशी फार मुडद्यात होते ..
कुणी एक रेडा, झपाटून जावा,
असे लाल या काय रंगात होते ?
भले तोल जावो, भले चाल बदलो ..
तरी चालणे हे दिमाखात होते ..
कुणी काव्य केले, कुणी गीत केले ..
अखेरीस त्यांची, हजामात होते ..
नडे या कवीशी नडे त्या कवीशी ..
तुला"केशवा"टेकले हात होते ..