(देवा)
नेमकी होते नको त्याचीच टाळाटाळ देवा
क्षम्य सारे प्रेमवेड्यांना, जरा सांभाळ देवा..
ते तुझी घेतात नावे, मागताना तोलताना
घाल त्या गळ्यांत दिल्लीची नव्याने माळ देवा
पाहिले आहेस का तू रोख देताना कुणाला?
लाचखोरीने कधी झालास का घायाळ देवा?
आत येऊ लागले पाणी कशाने पावसाचे?
फाटलेल्या छप्पराने लाटले आभाळ देवा
झगमगाटातून जपुनी ये जरा बाहेर तेव्हा
झोपड्यांचे मोडकेसे ठेव तू जंजाळ देवा
नवनवे वरिष्ठ सारे; काम सारे संथ झाले
आत स्टेनो लाडकीशी ;तूच रे सांभाळ देवा
नोकरीवर पाय कुणाच्या मी कधी देणार नाही
टंकण्याचे काम ना ये, नोकरी सांभाळ देवा!
शेवटी गोष्टीत रंगता सारे जायचे विसरून असते
ठेवितो ध्यानात सारे नेमके वेताळ देवा!
- कारकून
आधारित चित्त ह्यांची गझल देवा