ज्येष्ठ नागरिक जीवनसाथी

काय करावे? ज्येष्ठ नागरिक जीवनसाथी माझा
वाचव देवा! ज्येष्ठ नागरिक जीवनसाथी माझा

बाहुलीपरी सुंदर मी, मी चाले जशी मयूरी
पितामहापरि शिरकमलावर त्याच्या केस रुपेरी
ओंफस सगळे! ज्येष्ठ नागरिक जीवनसाथी माझा
काय करावे? ज्येष्ठ नागरिक जीवनसाथी माझा

इतरजनांच्या सवे मम पती बागेमध्ये गेला
फुले आणली साऱ्यांनी, हा कोबी घेउन आला!
किति अपकीर्ती! ज्येष्ठ नागरिक जीवनसाथी माझा
काय करावे? ज्येष्ठ नागरिक जीवनसाथी माझा

परिराज्याच्या सहलीला मज पती घेउनी गेला
स्थानभ्रष्ट मम पदर पाहता क्रुद्ध होउनी गेला
पुढे काय मग! ज्येष्ठ नागरिक जीवनसाथी माझा
काय करावे? ज्येष्ठ नागरिक जीवनसाथी माझा

विनंती : हे कोणत्या हिंदी गाण्याचे भाषांतर आहे ते ओळखावे.

(कृपया उत्तरे प्रतिसादात लिहावी. व्यनि पाठवू नये.

प्रशासकांना विनंती, कृपया बरीच उत्तरे जमल्यावर नंतर प्रकाशित करावी.)