मना सज्जना.....!

"मना सज्जना" कार प.पू. रामदास स्वामींची माफ़ी मागून.....  

मना सज्जना रोज उशीरा उठावे
येता परी जाग लोळत रहावे
बकाल्यात नवऱ्या पिटाळा दुधाला
फ़र्मान सोडा चहाचे तयाला

पितांना चहा झीब सोडावी सैल
दहादा म्हणावे नवऱ्यास बैल
सदा सर्वदा त्यावरी खेकसावे
गुलामा कधी तोंड उघडू न द्यावे

पगारास त्याच्या हिसकून घ्यावे
थोडेच पैसे खर्चास द्यावे
दुसऱ्याच दिवशी यादी करावी
तयाची त्वरेने खरेदी करावी

घरी पोचता ती खरेदी करुनी
बघावी खरेदी फिरुनी फिरुनी
शेजारच्या त्या हॉटेल मधूनी
मागवावे जेवण फोनवरुनी

हे सगळं केल्यामुळे माझा संसार कसा अगदी सुरळीत चाललाय.....

कसा नेटका आज संसार माझा
कसा साजिरा तो पतीदेव माझा
म्हणूनी सदा पूजिते मी वडाला
मिळू दे पती हाच सावित्रीला ह्या.

जयश्री

* बकाला - इथे कुवेतमधे डेली नीडच्या दुकानाला बकाला म्हणतात.