१४ एप्रिल च्या निमित्ताने हा लेख

१४ एप्रिल डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी केली जाईल पण रि.पा.इ.ऐक्याच काय. ऐक्य कधीही होणार नाही असे वाटते.रामदास आठवले,प्रकाश आंबेडकर,नामदेव ढसाळ, खोब्रागडे ,इत्यादी नेते कधी एकत्र येणार. केव्हा संघटित होणार.प्रत्येक जण निरनिराळ्या पक्षांना चिकटून बसलाय. आंबेडकरी तरुण ही वेगवेगळ्या पक्षात सामील होतोय.नवीनं तयार झालेला पक्ष निवडणूकीत जास्त जागा कमावतोय आणि हे नेते आपाआपसात लढून एक ,दोन जागांवर समाधान मानत आहेत. कधी सुचणार यांना शहाणपण . हे नेते बाबासाहेबांना दलितांपुरताच मर्यादित ठेवतात. स्मारक,पुतळे बांधून काय होणार आहे. समाजातील सर्व घटकात बाबासाहेबांचे विचार पोहचण्यासाठी काय केले पाहिजे यासाठी ही नेतेमंडळी विचार करताना दिसत नाहीत. पुरोगामी महाराष्ट्रासाठी आंबेडकरी चळवळ आवश्यक आहे हे ते विसरले की काय. प्रत्येक नेत्याने आपाआपसातील मीपणा सोडून जयंती निमित्ताने मोठ्या मनाने एकत्र यावे ही इच्छा.
आपण नेहमी म्हणतो मराठी माणूस जाईल तेथे भांडतो एकमेकांचे पाय खेचतो हे सूत्र रि.पा.इ.नेते नित्यनेमाने पाळतात. बसपा सारखा उ.भारतातील पक्ष महाराष्ट्रात पाय रोवण्यास उत्सुक आहे. आज ना उधा या नेत्यांच्या भांडणामुळे बसपा. महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर नाव उमटवेल या जरतर च्या गोष्टी असल्यातरी या सर्वाला कारणीभूत कोण असणार आहे. तेव्हा याचे भान या नेत्यांनी ठेवावे असे वाटते.
आपला
कॉ.विकि