काय द्यावा भात हल्ली जावयांना

काय द्यावा भात हल्ली जावयांना
त्यात दिसतो घात हल्ली जावयांना

राक्षसांची गरज नाही कलियुगाला
सासवा खातात हल्ली जावयांना

सहज शब्दाने खिसा कापून जाती
सहज जमतो घात हल्ली जावयांना

पाहती दिड्‍मूढ सारे पानवाले
टाकताना कात हल्ली जावयांना

पाहिजे सारेच ताबडतोब आणिक
पाहिजे हुंड्यात हल्ली जावयांना

भेट होते मागण्यांमधुनीच केवळ
कारणे नसतात हल्ली जावयांना

सासऱ्यांचे काय रे होणार 'माफी'?
सासवा भजतात हल्ली जावयांना

-माफी
मिलिंद फणसे ह्यांच्या जेहत्ते कालाचे ठायी वर आधारित