चावला

आमची प्रेरणा जयंतरावांची सुरेख गझल दाखला

हा वाकला तो धावला
"जो वाकला, तो संपला"

उठणे कसे, बसणे कसे
नाजूक आहे  मामला

पाहून हालत अन मला
तो वैद्य सुद्धा हासला!

खोडी न त्याची काढली
मग तो मला का चावला?

माझ्यात होते काय जे
त्याने चुना मज लावला

सोडेन हा कोणास ही
इतका कसा हा माजला

"केश्या"तुझा कलगीतुरा
भलताच होता गाजला

(केशवसुमार६९)