तसा नेहमी...(२)

आमची प्रेरणा - अजब यांची सुंदर गझल तसा नेहमी...

तसा नेहमी बासुंदी मी असायचो
तिच्या मुखी कारलेच हो‍उन बसायचो

उमेद होती बघण्याची जेव्हा तिजला
खिजगणतीतही तिच्या कधी मी नसायचो...

ओळख माझी कसे विसरले अताच हे?
उधार देउन किती जणांना फसायचो !

पाडत होतो कवने मी पूर्वीदेखील...
पण कवनांवर लेखन-कंबर कसायचो...

टवाळ होतो, नव्हतो लोचट इतका मी!
क्वचित-प्रसंगी खोडसाळही असायचो..