ऑक्टोबर ११ २००४

सामान्यरूप विचार

१. 'उपांत्य दीर्घ ई,ऊ असलेल्या शब्दांचा उपान्त्य ईकार, ऊकार उभयवचनी सामान्यरूपाच्या वेळी हस्व लिहावा.

उदा : गरिबास, वकिलांना, सुनेला, नागपुरास

अपवाद : दीर्घोपान्त्य तत्सम। शरीरात, गीतेत, सूत्रास, जीवास

वरील नियमाप्रमाणे

समजूत समजुतीने
निवडणूक निवडणुकीत
तपशील तपशिलात
२. उपान्त्य `ई, ऊ' असलेल्या तत्सम शब्दांनाही वरील नियम लागू होत नाही.

उदा :

परीक्षा परीक्षेत
वीर वीराने
दूत दूतास
विद्यापीठ विद्यापीठात
सूत्र सूत्रातील

३. परंतु शब्द तीन अक्षरी असून त्याचे पहिले अक्षर दीर्घ असेल तर अशा शब्दाच्या सामान्यरूपात उपान्त्य ई, ऊ यांच्या जागी` अ' आल्याचे दिसते.

उदा :

तालीम तालमीचा
बेरीज बेरजेला
पाटील पाटलाने
माणूस माणसाची
लाकूड लाकडाचा

४. शब्दाचे उपान्त्य अक्षर 'ई' किंवा 'ऊ' असल्यास सामान्यरूपात `ई' च्या जागी 'य' येतो. तसेच 'ऊ' च्या जागी 'व' येतो.

उदा :

फाईल फायलीत
देऊळ देवळात
पाऊस पावसात

५. पुल्लिंगी शब्दाच्या शेवटी `सा' असल्यास सामान्यरूपाच्या वेळी `शा' होतो.

उदा :

पैसा पैशाचा
घसा घशाचा
ससा सशाचा

६. पुल्लिंगी शब्दाच्या शेवटी असलेला `जा' सामान्यरूपात तसाच राहतो त्याचा `ज्या' होत नाही.

उदा :

मांजा मांजाने
सांजा सांजाची
गांजा गांजाचे

७. शब्दाच्या मधे येणा या `क' किंवा `प' चेद्वित्वरूप सामान्यरूपात निघून जाते.

उदा :

रक्कम रकमेचा
तिप्पट तिपटीने

८. शब्दाच्या मधे येणा या `म' पूर्वीचे अनुस्वारसहित अक्षर अनुस्वारविरहित होते.

उदा :

किंमत किमतीचा
गंमत गमतीने
हिंमत हिमतीने

९. ऊकारान्त विशेषनामाचे सामान्यरूप होत नाही.

उदा :

गणू गणूस
शकू शकूची

१०. धातूला `ऊ' किंवा `ऊन' प्रत्यय लावताना धातूच्या शेवटी `व' असेल तरच `वू' किंवा `वून' होईल.

उदा :

चाव चावू चावून
लाव लावू लावून
जेव जेवू जेवून
खा खाऊ खाऊन
धू धूऊ धूऊन

११. मराठी शब्दातील अन्त्य अक्षर दीर्घ असले तर उपान्त्य इकार वा उकार र्‍हस्व असतो.

उदा : किड, गुणी, पिसू, मेहुणा, वकिली, पाहिजे, गरिबी, महिना।

थोडक्यात वरील नियम फक्त 'ऊन हून` प्रत्ययासाठी आहे. 'उन` प्रत्यय लावताना खा चे खाऊन आणि धू चे धुऊन असेच रूप होते.

धू धुवायला   धुववत नाही
खा खावयाला खायला खाववत नाही

अशा रूपांच्या वेळी 'व` च वापरलाजातो.


 टीप : येथील मजकूर सुखदा ह्यांनी मायबोली येथे लिहिलेल्या अनेक लेखांच्या आधारे त्यांच्या सहमतीने तयार केलेला आहे.

Post to Feedआदरार्थी वापर
नितिनरावांना, अमुकपंतांना

Typing help hide