क्षणभंगुर

मीकाय रे ईकडे कुठे ??  .. 

 अमोघः जरा खरेदी साठी आलेलो   लक्षमी रोड ला  .. तु आणि .. पुण्यात कसकाय? 
तीः अरे मुंबईहून जस्ट शिफ्ट  झालो आहोत.. अमित आणि मी ..
अमित ला एका एम. एन. सी छान ऑफर मिळाली..  मस्त १२ लाखांच पॅकेज आहे.. आणि असपण कंटाळा आला होता रे मुंबईच्या लाईफ स्टाईलचा.

अमोघ ला आश्चर्याचा धक्का  बसला नमीताला पाहुन..  पुण्यातल्या  लक्षमी  रोड वर  नमीता शॉपिंग साठी आली होती..
ती त्याला सांगतच होती  तिच्या पुणे स्थलांतराबद्दल..  पण तो मात्र शुण्यात  हरवला होता..

तिला पाहताच तो  भुतकाळात गेला.. ८  वर्षांपुर्वी हीच आपल्याला पहिल्यांदा भेटलेली मुंबईच्या के.जे. सोमैय्या कॉलेजला.. 
त्याच्या द्रुष्टीपुढे त्यांच्या मैत्रीचा सुवर्णकाळातील एक एक आठवणी तरळू लागल्या..
तसे त्याच्या डोळ्यांच्या कड्याला पाणी भरुन आले..

तीः हेलॉ अमोघ.. अरे कुठे हरवलास?? (तिच्या लक्षात आले असावे बहुतेक ह्याला काय झाले आहे तिने विषय बदलला)
       अरे आई कशी आहे? आणि  दादा कसा आहे आता .. वहीनीं परत आल्या का घरी हॉस्पीटल मधुन.. ?

अमोघ : (आजुनही शुण्यात हरवलेला) अं........

तीः अरे मी काय विचारतेय???

अमोघः नाही आई नाहीये आता... १ वर्षापुर्वीच ती गेली.. आणि वहीनी आहेत.. सध्या फिजीओ चालू आहे.. पुर्णपणे बर्या   व्हायला आजून २ वर्ष तरी जातील.. दादा पण मजेत आहे.. खुप सेवा करतो वहीनींची..

तीः सॉरी रे... मला काहीच माहीत नाही  झाले आईंबद्दल..  नाहीतर...

अमोघः ( मनातल्या होणार्या चिडचिड ला आवरुन)  ईटस ओके.. चल   मला निघायला हव .. घरी वाट बघत असतील दादा आणि वहीनी.

नमीताः आजून पर्यंत रागावलेलाच आहेस का  माझ्यावर?

अमोघः ................. 

नमीता: प्लीज अरे काहीतरी बोल ना..

अमोघः जाऊदे ..  चल बाय.. वाटले  नव्हते अशी अचानक भेटशील...

नमीताः माझा सेल नं. ९९२३******  वाट बघेल तुझ्या फोनची... बाय

अमोघः अं....  बाय ..

आज  चक्क ४ वर्षांनंतर त्याला ती भेटली..
ह्या ४ वर्षांत त्याच्या आयुष्यात काय ऊलथा पालथ झाली.. आणि कसा नमीता चा आणि त्याचा संबंध तुटला  त्या एका एका क्षणांची आठवण त्याच्या मनाच्या अंतर  पटलावर ऊमटत होती...

त्याची आणि नमिता ची भेट कॉलेज च्या पहिल्याच दिवशी दोघेही सोमैय्या कॉलेज च्या भल्या मोठ्या कँपस मध्ये  आपले कॉलेज शोधत होते... आता ईंजी. कॉलेज आहेच एकदम कोपर्यात सापडायला एकदम कठिन नवीन माणसाला तरी..

पहीला दिवस म्हनून नमीता चे बाबा आले होते सोडायला तिला.. अमोघ चा पण पहिला दिवस होता.. 
तो ही कॉलेज शोधतोय आणि ईकडे नमीता आनी तिचे बाबा पण..  
त्यांची भेट झाली ती पण सोमैय्या कँपस मधल्या आर्टस कॉलेज समोर.. नमीताच्या बाबांनी त्याला विचारले..
एक्सक्युज मी .. ईंजी. कॉलेज कुठे असेल सांगू शकाल का?
अमोघः  अहो काका मी पण तेच शोधतोय...
बाबाः अरे अस का? फर्स्ट यियर ला आहेस का?
अमोघः हो .. कॉंप्यु. ईंजी.
बाबाः अरे वा.. ही माझी मुलगी नमीता फर्स्ट यियर आय टी. ला आहे..
अमोघः हाय .. मी अमोघ  काळदाते ..  चला आपण कॉलेज शोधुयात... मला एकाने सांगितले की सरळ जाऊन डाविकडे गेलो की आहे कॉलेज.
नमीता:  बाबा  तुम्ही जा ना घरी मी शोधेल कॉलेज आणि अमोघ पण आहे सोबत .. मला खुप ऑकवर्ड  वाटत आहे.. तुम्ही कॉलेजला  येत आहात सोडवायला याचे.. मी काय के. जी. मध्ये आहे का आता..
बाबा : अग तसे नाही ग.. थोडी काळजी वाटते दुसरे काही नाही.. पण हा सोबत आहे तर  मी जातो.. टेक केयर ..  आणि कॉलेज संपले की लगेच घरी ये.. आणि  रस्ता चुकलीस वगैरे तर कॉल कर...
नमीता : बाबा बस ना आता  ................
अमोघ : (मिष्कील पणे  हसत होता हे द्रुष्य बघुन)
नमीता : बाय बाबा.. सी यु ईन द ईंव्हीनींग..
 
नमीता आणि अमोघ ह्यांची ती पहीली भेट.. आणि कॉलेज मध्ये दुसरे कोणी जास्त ओळखीचे पण नव्हते.. आणि फर्स्ट यियर ला असल्यामुळे त्यांना एकच वर्ग मिळाला होता वेगवेगळी  ब्रँच असली तरी.. 
लंच ला पण ते सोबत जात असत.. हळूहळू त्यांचा अभ्यास, क्लास रुम मधल्या असांनमेंटस शेयर होऊ लागल्या..
आणि मैत्री घट्ट होऊ लागली..
सुरुवातीला अमोघ च्या मनात काहीपण नव्हते.. पण कॉलेज चे ऍन्युअल गॅदरींग आले.. फ्युजन फेस्ट ..
आणि त्यादिवशी नमीता   चक्क साडी घालून कॉलेज ला आली.. अमोघच्या मनात तिला पाहून अश्या काही संवेदना निर्मान  झाल्या की त्याचे त्याला कळेना ... की आपल्याला काय होते आहे.. 
त्या दिवशी ति  त्याला नेहमी प्रमाने मन मोकळे पणाने बोलत होती.. पण तो मात्र खुपच अस्वस्थ होत होता...
फेस्टिवल संपले तसे रुटीन परत सुरू झाले पण अमोघ च्या वागण्या आणि बोलण्यामध्ये फारच फरक पडला होता..
तो तिच्या प्रत्येक आवडी निवडी कडे लक्ष देत होता तिला कॅडवरी आवडते म्हणून तिच्या साठी न चुकता घेऊन येत असे..
विद्याविहार स्टेशन वर ती ज्या ट्रेन नी यायची  त्या ट्रेन ची तो वाट बघत असे आनी ती आली की मग ते सोबत कॉलेज ला जात..
सुरुवातीला मात्र ते फक्त कॉलेज भेटत..
त्याच्यात झालेला हा फरक नमीता मधल्या स्त्रीने केंव्हाच ओळखला होता..
तिच्या  पन मनामध्ये खुप काही विचार  तरळू लागले अमोघ बद्दल .. नाही म्हणटले तरी तो दिसायला बर्यापैकीच होता..
आणि अभ्यासात पण हुशार..  त्यात  त्याचा तो मनमिळावु स्वभाव आणि व्यक्तिमत्व ह्याची   छाप केंव्हाच तिच्या नकळत तिच्या मनावर पडली होती...
आग दोनो तरफ से लगी थी ... पण पहीला प्रोपोज  करणार तरी कोण..
असेच सरता सरता एक वर्ष गेले.. रिसल्ट तसा मस्तच लागला.. नमीता आणि अमोघ ला फर्स्ट क्लास आला..
पण आता दुसर्या वर्षी पासून त्यांचे वर्ग वेगळे झाले.. आणि त्यामूळे ह्यांच्या गाठी भेटी कॉलेज मध्ये कमी होऊ लागल्या.

नमीताचा आता नवीन मित्र वर्ग जमा झाला.. लंच टाईम दोघांचा वेगळा असल्यामुळे  ती आता तिच्या मित्रांबरोबर लंच ला जाऊ लागली नाही म्हणटले तरी फोन वर वगैरे रोज बोलायचे. पण रोजचा रुटीन मोडल्यामुळे अमोघ अस्वस्थ होता..
आणि ही झालेली ताटातुट तर त्याला सहन होत नव्हती.. 
विकएंड ला त्याने तिला भेटायचा खुप प्रयत्न केला पण ती ह्या ना त्या कारणाने त्याला टाळू लागली..
ह्याचा परिणामी तो अबोल  झाला.. मित्रांमध्ये पण मिसळत नसे..
त्याचा एक चांगला मित्र झाला होता तसा "राजु जाधव" ..   पण संबध फक्त कॉलेज पुरता.. 

नेहमी प्रमाणे ह्या वर्षी पण फ़्युजन फ़ेस्टीव्हल आले.. अमोघ नि नुसती बघ्याची भुमिका घेऊन आला होता..
नमीताने ह्या वेळेस डांस काँंपीटीशन मध्ये भाग घेतला.. तिचा मेल पार्टनर होता रुपेश..
त्या दोघांचा सालसा डांस खुपच अप्रतिम झाला.. अख्ख्या कॉलेज मध्ये दोघे फेमस झाले...
आणि अमोघ ला आता मात्र हे सहन झाले नाही ... पुर्ण जळफळाट झाला त्याचा..
जमेल तितक्या लवकर त्याने त्या फंक्शन मधून काढता पाय घेतला.. आणि बाहेर च्या  टपरीवर येऊन रडत बसला..
त्याला काय करावे हे समजेना.. त्यानी अख्खी हकीकत राजुला सांगितली..

राजुः अरे मनात आहे ते तर सांगून टाक तिला..
अमोघः मैत्री तुटेल
राजुः अरे अशी कोणती मैत्री राहीली आहे तुमची...
अमोघः ते खरे आहे रे .. पण मला नाही वाटत तिच्या मनात काही आहे माझ्याबद्दल.. मला ती नेहमी प्रमाणे मनमोकळे पणाने बोलत नाही.. आधी आम्ही सोबतच लंच ला  जायचो.  एकमेकांशिवाय जेवण पण नव्हतो करत कँटीन मध्ये आणि आता अचानक ती  एवढी बदलली ह्यावर विश्वास बसत नाही ...  
राजुः ती एवढी का बदलली असावी असे वाटते तुला?
अमोघः मे बी आमचे वर्ग  आता वेगळे  झाले आहेत.. शिवाय  असाईनमेंट्स पण काही कॉमन नाहीये..
राजु : म्हणजे तुमची मैत्री फक्त अभ्यास आणि असाईनमेंटस ईतकीच  होती का?
अमोघः बहुतेक असेलही तिच्या कडून पण माझ्या कडून  तसे काही नाहीये.. म्हणजे आय मीन मी  फक्त अभ्यास आणि असाईन्मेंटस व्हावीत म्हणून मैत्री केली नव्हती रे... मला तिची कंपनी खुप आवडायची .. ती सोबत असली की बाकी सगळे असले काय आणि नसले काय .. फारसा फरक नाही पडायचा..
पण तिने असे तोडून वागावे हे  पटत नाही..  आणि मी काय चुक केली आहे ते पण नाही सांगत..
राजु : (हा हा हा) अरे हे बघ वाईट वाटून घेऊ नको.. मी सांगतो ते ऐक .. तिचे  तुज्झ्यावर १००% प्रेम आहे.. फक्त तु ते एक्ष्क्प्रेस करावे  म्हणून ती असे वागत आहे.. दॅटस ईट.. 
टु एकदा सांगून तरी बघ ना.. असा धुसमळत राहून काय फायदा आहे.. ?
एकदाच दुध का दुध आणि पाणी का पाणी होईल..
जास्तीत जास्त काय होईल ती नाही म्हणेल  ना.. मग ठीक आहे..  एकदाचे तुझे पण मन मोकले होईल ..
लाईफ मध्ये सेंटी होऊन नाही चालत जस्ट ऍक्सेप्ट द   फ़ॅक्टस .. 
अमोघ : ह्म्म बरोबर आहे.. पण हिम्म्त नाही होत समोर जाऊन सांगायची..
राजु :  बस्स का एवढेच ना.. चिठ्ठी मध्ये लिहून दे ना मग.. 
अमोघ नि आढे वेढे घेत  चिठ्ठी  मध्ये जमेल  तेवढ्या सोज्वळ भाषेत आयुष्यातील पहिले प्रेम पत्र लिहीले (ते पण १०-१५ कागदाचे बोळॅ फाडून )..
त्यानी   चिठ्ठी जमेल तेवढी हिम्मत करून नमीता ला ऐन फंक्शन मध्ये दिली..
अमोघ: नमीता .. अग मला तुला काही बोलायचे आहे..
नमीताः काय? मी बिझी आहे आता पुन्हा केंव्हातरी बोलु..
अमोघ् : अग फक्त १० सेकंद.. 
नमीताः (गालातल्या  गालात जीभ फिरवत) ठीक आहे काय ते लवक्र बोल..
अमोघ : (घामाघुम झालेला आणि भीतीने थरथरत) घामाघुम आणि भीतीने  कापणार्या हातानी चिठ्ठी पुढे केली..
नमीता : काय हे.. मला नको.. 
अमोघ् : प्लीज घे.. 
नमीताः काय लिहीलय ते वाचून दाखव नाहीतर फाडून टाकून दे.. 
अपमानीत झाल्या  सारखे वाटले त्याला... हिला एवढा वेळ झाला ईज्जतीत सांगतोय .. कळत नाही का..
(नाही म्हणटले तरी मैत्री चा हक्क  होताच)
भयानक संतापून  अमोघ म्हणाला..
"नमीता प्रत्येक गोष्टिला काही मर्यादा असतात... मला वाटते त्या आता तु पार केल्या आहेस   ठिक आहे.. देतो फाडून ही चिठ्ठी पण ह्या पुढे तुझा आणि माझा काहिही संबंध नाही ...  थँक्स फॉर एव्हरिथींग"
त्याचे संतापलेले रुप नमीता प्रथमच पाहत होती..
ति सुद्धा त्याचे हे रुप पाहून नाही म्हणले तरी घाबरलीच ..
लगेच तिने.. म्हणले.. ठिक आहे अमोघ प्लीज  चिडू नकोस.. आण ती चिठ्ठी ईकडे..
अमोघ: (भयानक संतापलेला होता) त्याने त्या चिठ्ठी चा   चोळा मोळा करून तिच्याकडे फ़ेकली... आणि निघून गेला..

परत दोन  दिवसांनी .. ती त्याला भेटायला आली.. आणि आल्या आल्या अमोघ  समोर एक  चिठ्ठी ठेवली.. आणि लाजुन पळून गेली 
त्यात लिहिले होते..
"येडे  बुआ कुठले म्हणे प्रेम करताय.. आणि असे कोणी ओरडते का आपल्या प्रेयसी वर ते पण चार   चौघांसमोर?
ह्म्म  चुकले असेल मी पण.. मैत्रीणीचा सल्ला पाळत होते .. शक्य तितके तुला अव्हॉईड करायचे.. खरच बघायचे होते तु माझ्या शिवाय राहू  शकतो का नाही ते

मी तुला केंव्हापासून आवडते ते  माहीत  नाही अमोघ मला पण मला तु पहिल्या दिवसा पासून आवडतोस..
तुला खुपदा सिग्नल देऊन देऊन  कंटाळून गेले.. तु  ठोंब्या तो ठोंब्याच   राहिलास..
कितीदा सांगितले बँड स्टँड/ नरिमन पॉईंट  ला जाऊयात फिरायला तिकडे कपल्स येत असतात.. आपण पण फिरुयात त्यांह्या सारखे.. फिरलो पण २-३ वेळेस पण तुझ्या मंद  बुद्धीत कधीच प्रकाश नाही पडला.. तेंव्हा पण प्रेयसि म्हणून ठेवायचास..
तळहाताच्या फोडासारखे जपायसास मला.. पण कधी एका शब्दाने  सुद्धा बोलला नाहीस .. 
सुरुवाती च्या वर्षाला मी वेड्या सारखी तुझ्या मैत्री आणि सहवासात गुरफटून गेले...  
पण नाही अमोघ हे अव्यक्त प्रेम खुप बोचत होते मनाला.. म्हणून एका जवळच्या मैत्रीनी ला सांगितले..
तर तिने तुझ्या पासून दुर जायचा  सल्ला दिला.. 
तु जेंव्हा केंव्हा मला बोलायला यायचास तेंव्हा मी तोडून बोलायचे ना तुला.. खुप त्रास व्हायचा अंतकरणात  तुला टाकून किंवा घालून पालून बोलताना... आणि नंतर घरी गेले की रडत बसायचे वेड्यासारखी तुला त्रास दिला म्हणून .. 
मी मनापासुन माफी मागते अमोघ तुझी .. आय लव्ह  यु टु ..

तुझीच
नमीता...   " ..