क्षणभंगुर - ३ (अंतिम)

फेब्रु. आणी मार्च महिना.. काळदाते फॅमीली साठी एक पर्वणीच ठरला..

अमोघ चे लग्न ठरले.. त्याच्या भावाला (दादाला) प्रमोशन मिळाले.. तसेच पगार वाढ पण.. आणी वहिनींना पण एका संस्थेच्या कॉलेज मधे क्लॉक हावर बेसीस वर नौकरी मिळाली..
ह्या सगळ्यामधे अमोघ चे बाबा आणी आ‌ई खुप खुश झाले होते..
अमोघ चे बाबा हे मार्केटींग जॉब मधे होते.. त्यामुळे त्यांना महिन्यातुन १५ दिवस तरी किमान फिरतीवर रहावे लागत असे.. अमोघ ला एकदा नौकरी लागली .. की स्वेछानिव्रुत्ती घे‌ऊन टाकु असे त्यांनी मनोमन ठरवले,, नाहीतरी त्यांना आजुन काय हवे होते.. दोन्ही मुले आणी दोन्ही सुना नौकरी करणार.. पैशाची कमतरताही भासनार नाही.. आणी आपल्या पी.एफ. आणी सेव्हिंग्स मधुन रक्कम जमा करुन .. अमोघ आणी नमीता साठी ह्याच बिल्डींग मधे अपार्ट्मेंट घे‌ऊन टाकता ये‌ईल..
एके दिवशी नमीता ला घरी बोलावुन त्यांनी आपल्या मनातले विचार सर्वांसमोर मांडले..
अगदी सर्वांच्या मते.. त्यांना अनुमती मिळाली..
अमोघ आणी दादा नी तर त्यांना आताच रिटायर्मेंट घा असे सांगुन दिले..
पण बाबा म्हणाले... जो पर्यंत तुझा फ्लॅट बुक होत नाही तोपर्यंत नोकरी करनार..
आणी ज्या दिवशी फ्लॅट बुक झाला त्या दिवशी पासुन मी मोकळा, व आमच्या सर्व जबाबदार्या पण संपल्या...
दादा:( अंकिता कडे पाहुन) बाबा .. असे काय म्हणताय.. आजुन नातवंडे खेळवायचे आहेत की तुम्हाला...
अंकीता: अहो तुम्हाला काय कळतेय का. निदान .. नमीता समोर तरी ...
दादा: अग आपल्या मागुन नंबर असेलच की ह्यांचा...
अंकीता: चला तुमचे आपले काहीपण.. .(आणी लाजुन ती आपल्या बेडरुम मधे निघुन गेली)..
आ‌ई : अरे काय चालले तरी काय आहे तुमचे..? आणी ती अशी लाजुन आत का गेली??? ऑ ??
बाबा: अहो बा‌ई साहेब .. आपले थोरले चिरंजीव. नातवंडाच्या बाबतीत बोलणार तर ती लाजेलच ना...
आ‌ई: तुम्हाला आहे ना.. आम्हा बायकांबद्दल काही म्हणजे काही कळत नाही...
काय हो महाराज काय गुपीत आहे??? मला जी शंका आहे ती खरी आहे का??
दादा: (चेहर्यावर गुलाबी हास्य आणून आणी मान खाली घालुन) हो आ‌ई ... तु आता आजी होणार आहे.. आणी बाबा तुम्ही आजोबा....
अख्ख्या घरात एकच जल्लोष झाला...
बाबां आणी आ‌ई.. जमेल तितक्या आणी आठवतील तेवढ्या नातेवा‌ईकांना फोन करुन सांगत होते..
अमोघ आणी नमीता यांनी दादा जवळ पार्टी चा हट्ट केला.. आज पार्टी पाहीजे म्हणजे पाहीजे...
डीनर @ कामत्’स.
सगळ्यांनी त्या रात्री मस्त पै़की डिनर केला.. नमीताच्या घरच्यांनी दादा आणी
वहिनींला अभिनंदन केले ..
आ‌ईने तर अंकिताला सुचना द्यायला सुरुवात केली.. आणी सगळे घरातले काम आता त्याच बघत होत्या... अंकिताचे माहेर कोकणातले असल्यामुळे .. त्यांनी निर्णय घेतला.. की ईकडे मुंब‌ईतच आपण डीलीव्हरी करुयात.. कोकणातल्या गावामधे कुठे फॅसिलीटी आणी चांगले डॉक्टर पण नसतात..
ईकडे अमोघ आणी नमीताचा अभ्यास आणी कॉलेज नेहमीप्रमाने छानपैकी चालु होते...
आणी त्या दिवशी... दि. १ एप्रिल २००५ (शुक्रवार)...
दादा: हॅपी फर्स्ट मॅरेज ऍनीव्हरसरी अंकीता.. आणी येस्स आधी डोळॅ बंद करायचे.. गॉट अ सरप्रा‌ईज..
अंकीता: काय हो सकाळचे ७ वाजलेत.. ७ तास ऊशीराने... विश करताय.. काल रात्रीच.. माझ्या आ‌ई बाबा ने विश केले..
दादा:(अंकिताला मिठीमधे घे‌उन) अग पण आपले लग्न भारतीय प्रमान वेळे नुसार दुपारी १२:२४ मी. नी झाले ..
तसे पाहिले तर ६ तास लवकरच विश करत आहे मी..
अंकिता: चला चावट कुठले.. आधी डोळे कशाला बंद करायला सांगितलेत ते सांगा..
दादा: ऊघड आता डोळॅ................
अंकिता (डोळे ऊघडुन) वॉव.. ईट्स डॅम ब्युटिफुल............ खुपच मस्त आहे हो. अहो पण किंमत किती.. ह्या नेकलेस ची..
दादा.. ओ मिडल क्लास .. काय राव आम्ही येवढ नौकरी तुन पैसे वाचवुन डायमंड नेकलेस आणायचा आणी .. किंमत विचारते.. कमाल आहे बु‌आ...
अंकिता: अहो नको का विचारायला... आपल्या घरी आजुन एक जण येणार आहे ना... खर्च पण वाढेल..
दादा: ह्म्म.. बघु तेंव्हाच्या तेंव्हा... राणी .. आज आहे ना मस्त पैकी बाहेर जा‌ऊयात.. तु पण सुट्टी घे.. मी तर घेतोच आहे..
अंकिता: अहो .. सुट्टी नाही ना जमनार.. पर्मंनंट नाही झाली आजुन मी..
फक्त एक करु शकते.. कॉलेज मधुन आज लवकर विचारुन घरी येते.. मग तर चालेल ना..
अस पण ६ महिने प्रोबेशन पिरेड आहे.. आणी पुन्हा मॅटर्नीटी लीव्ह पण लागेल ना कंफर्म झाले की..
दादा: काय ह्या जिमेदार्या.. अग एक दिवस तरी.. फक्त आपल्याला ठेव ना... प्लीज..
अंकीता: ओ लाडॉबा.. बस्स झाले आता... मला आवरायचे आहे.. आणी म्हणाले ना येते लवकर.
आणी हा डायमंड नेकलेस सगळ्या मैत्रीनींना पण दाखवायचा आहे...
दादा: ठीक आहे .. जा .. पण घरी कुणीतरी वाट बघत आहे.. लक्षात असु द्या...
अंकिता: हल्ली तुमचे नखरे खुप वाढायला लागलेत.. जा तुम्ही पण ऑफीसला आज..
फुकटची सुट्टी वाया कशाला घालवताय.. आणी घरी बसुन काय नुसते लॉळत पडणार... नाहीतर टी,व्ही. बघनार..
दादा: ओके मॅडम चुकच झाली.. ये जा‌उन कॉलेजला वाट बघतो घरी.. ईंतजार का मजा आज हम भी लेंगे..
अंकीता आवरुन ऑफिस ला गेली.. अमोघ ला फायनल सेम च्या प्रोजेक्टचे काम होते म्हणुन तो कॉलेजात गेला....
दादा: ये आ‌ई आज ना मस्त पैकी मेनु कर जेवायला..
आ‌ई: हो का राजे.. आम्हाला माहिती होते आज आपला स्पेशल डे आहे... सो आज तुझ्या आणी अंकिताच्या आवडिचा दहिवडा बनवला आहे स्पेशल..
अंकिताने फार हौसेने कॉलेज मधे नेकलेस दाखवला.. आणी प्रिन्सिपल सरांची परवानगी घे‌ऊन ती लवकर ऑफिस मधुन निघाली...
आणी हीच ती वेळ जिथुन काळदाते कुटुंबावर घातचक्राची सुरुवात झाली..
अंकिता.. नेहमी प्रमाने लोकल ट्रेन ऊतरुन बेस्ट च्या स्टॉप कडे जायला निघाली आणी तिथल्याच रस्त्यावर एका ईंडीकाने तिला मागुन ये‌ऊन जोराची धडक दिली..
ऐरवी रस्ता रहदारीचा असतो.. पण आज ती लवकर घरी यायचे होते म्हणून दुपारी १ वाजताच त्या रस्त्यावर होती .. आणी त्या भरधाव धावनार्या कार ने तिला रस्त्याच्या एका बाजुला फेकुन दिले होते..
तिच्या गळ्यातल्या डायमंड नेकलेस केंव्हाच तुटुन पडले.. आणी त्यातील हिरे सर्व्र रस्त्यावर विखुरले गेले..
आणी ती रक्तबंबाळ अवस्थेत पडुन होती..
ईंडीका चा ड्रायव्हर केंव्हाच पोलीस स्टेशनला पसार झाला...
अंकिताला अँम्म्बुलंस मधुन जवळच्या हॉस्पीटल मधे दाखल केले..
ईकडे घरी दादा वाट बघत होता.. आजुन कशी आली नाही ही...
आणी जेंव्हा घरी ती हॉस्पीटल मधे आहे ह्याची बातमी कळाली.. त्याच्या पायखालची जमीन सरकली..
तो आ‌ईला घे‌ऊन हॉस्पीटल मधे आला..
अमोघ ला पण फोन करुन यायला सांगितले..
जो पर्यंत हे सर्व तिकडे पोहचले.. तेंव्हा डाँ नी सांगितले..
आय ऍम सॉरी मि. काळदाते.. -- मी तुमच्या मुलाला नाही वाचवु शकलो..
जेंव्हा अपघात झाला तेंव्हा त्या पोटावरच पडल्या त्यातुनच ईंटरनल ब्लीडींग झाले.. आणी मेंदुला मार लागला आहे खुप.. "शी ईज ईन कॉमा ना‌ऊ.. " तिला परत कधी जाग ये‌ईल सांगता येत नाही..
आणी जाग आली तरी मेमरी लॉस ची पण शक्यता आहे.. आणी आजुन एक
मेंदुचा पुर्ण ऊजवा भाग रिस्पाँड करत नाही आहे.. सो पॅरेलीसीस ची पण शक्यता आहे..
असे एका मागे एक धक्के डॉ. देत होते...
अमोघ, दादा आणी त्याची आ‌ई सगळे फक्त ऐकत होते.. पण काय होते आहे ह्याचे कूणाला सुध्दा भान नाही..
१-२ आठवड्यांसाठी नमीताच्या घरचे ये जा करुन गेले.. पण परदु:ख ते शीतलच असते..
पुन्हा सगळे जन आपल्या आपल्या कामाला लागले.. पण अमोघ च्या बाबांना ह्या घटनेचे फार दु:ख झाले.. त्यांना होणारा पहिला नातु.. न जन्मता म्रुत झाला...
माझ्यावरच का ही वेळ आणावी ईश्वरानी, मी काय पाप केले असतील.. असे कित्येक विचारांनी त्यांना गुरफटुन टाकले..
आणी ह्यामुळेच त्यांचे कामात पण लक्ष लागत नसे..
शेवटी जे घडायचे तेच घडले.. मार्केटींग मधे असल्यामुळे.. त्यांनी आयसी‌आयसी‌आय बँक ला जो क्वोट द्यायचा होता.. तो एच.डी.एफ.सी. बँक ला दिला.. आणी
एच.डी.एफ.सी. चा सीटीबँक ला...
ही फारच मोठी चुक होती .. कारण त्या क्वोट सोबत, त्या बँकेची सेंसीटीव्ह ईन्फॉरमेशन पण एक्शचेंज झाली होती..
अगदी अक्षम्य असा गुन्हा त्यांच्या कडून नकळत झाला... उभ्या आयुष्यातील २७ वर्ष नोकरी मधील पहिली चुक.. ती पण एवढी मोठी....
कंपनी कडुन करोडो रुपयांचे कॉन्ट्रॅक्ट केंव्हाच निघुन गेले होते....
स्वता: कंपनीच्या जनरल मॅनेजर ये‌ऊन त्यांच्या सर्व ऑफिस समोर रागाच्या भरात ये‌ऊन नको तेवढा अपमान केला.. आणी त्यांना नौकरी पण गमावुन बसावे लागले..
ते जेंव्हा घरी परतले.. अगदी ३ दिवस कूणालाही काहीही बोलत नव्हते.. आणी जेवन पण मोजकेच घ्यायचे..
तिकडे अमोघ च्या परिक्षा चालु झाल्या होत्या....
आणी त्या दिवशी अगदी नको होते तेच घडले...
शेजारी राहणार्या .. कुलकर्णी आजी त्या घरात आल्या आणी अमोघच्या आ‌ईला नको तेवढे बोलुन गेल्या....
आजी: काय हो... काळदाते ना झाले तरी काय?? अशी कशी अफरातफर केली.. नक्कीच पैसे मिळाले असणार .. आता सुन तुमची अशी पलंगावर पडलेली..
हॉस्पीटलचा खर्च कसाकाय पुरणार हो... नाही का?? सगळ्या कॉलनी मधे हीच चर्चा आहे... शेवटी पैसा पेक्षा ईज्जत मोठी नाही वाट्त हो लोकांना ??
आणी ह्याच वेळेस बाबांनी ही गोष्ट ऐकली कुणीतरी ये‌उन जिवंत जाळावे.. किंवा हि प्रुथ्वी आता सगळी नष्ट व्हावी .. असे काहितरी त्यांना वाटून गेले...
पुढचे ४ दिवस त्यांनी सगळ्यांशी गोडीने वागले.. अमोघ च्या आ‌ईला पण खुप बरे वाटले...
अमोघ परिक्षा आणी वहिनींच्या टेंशन मधे होताच..
आणी आज जेंव्हा तो घरी परतला.. आ‌ई दाराच्या ऊंबराशी बसुन डोळेयाची पापणी न लवता आकाशा कडे बघत बसली होती...
आत मधे तो गेला तेंव्हा वहिनी चे डोळे रडून रडुन सुजले होते...
दादा .. ये दादा काय झाले सांग ना.. असे गप्प का सगळे ...
प्लीज कूणीतरी काहीतरी बोला ना......
तेवढ्यात नमीता पण मागुन आली..
नमीता: अमोघ.. पेपर मस्त गेला रे शेवटचा.. फर्स्ट क्लास तर सुयर आहे ना ह्या वेळेस...
(सगळ्यांकडे बघुन तिचा मुडच पालटला) ...
काय झाले.. सर्व असे गप्प का?? आ‌ई तुम्ही बोलत का नाही आहात काही???
अमोघः (मोठ्याने ओरडुन) प्लीज कुणीतरी काहीतरी सांगा...
दादा: बाबा आपल्याला सोडुन गेले.. ही घे चिठ्ठी...
त्याच्या ह्या वाक्यावर अमोघ मटकन खाली बसला.. आणी त्याच्या ही नकळत त्याच्या डोळ्यातुन अश्रुधारा वाहु लागल्या..
नमीता ला काय बोलावे तेच कळेना.. तिने चिठ्ठी वाचायला घेतली आणी म्हणाली अमोघ .. वाच तरी प्लीज काय लिहिले आहे.. बाबा गेले नाही आहेत.. ह्या जगातुन..
ते फक्त आपल्याला सोडुन गेले आहेत.. आपण शोध घे‌ऊयात ना त्यांचा... अरे कुणीतरी काहितरी करा आपण पोलीस मधे तक्रार दे‌ऊयात...
अमोघ ने निर्विकार हो‌ऊन ती चिठ्ठी घेतली वाचायला... त्यात लिहिले होते...
"प्रिय अमोघ्/ अनिल(दादा)/अंकिता/नमीता आणी वसु..
सर्व प्रथम मी तुमची मनापासुन माफी मागतो.. ह्या अत्यंत कठीण परिस्थीती मधे.. मी तुम्हाला सोडुन जात आहे..
माझी पण एक मजबुरी आहे जी मी तुम्हाला नाही सांगु शकत.. खरे तर मी गुन्हेगार आहे.. माझ्या कामामधे केलेल्या
खुपच मोठ्या घोटाळ्यामुळे माझी सर्व समाजात मान वर करुन चालायची हिम्मत नाही होत..
लोक पावलो पावली काहीना काहीतरी टोमने मारत असतात.. अगदी नको तेवढे..
मी ते सुध्दा सहन केले असते.. पण माझ्या चुकांमुळे तुम्ही अडचणीत ये‌उ नये ही मनोमन ईछा आहे.. .
मी आत्महत्या करायचा पण प्रयत्न केला.. पण मला तरी ते शक्य हो‌ईल असे वाटत नाही..
मी नमीता च्या आ‌ई वडिलांची आणी कुटूंबाची माफी मागतो..
आज मी जात आहे घर सोडुन कायमचा.. अमोघ .आज तुझा शेवटचा पेपर होता.. म्हणून एवढ्या दिवस हा निर्णय पुढे ढकलला..
मला खात्री आहे.. तु/नमीता आणी दादा आणी वहिनी तुमच्या आ‌ईची खुप काळजी घ्याल..
वसु: मी सप्तपदी वर घेतलेली शपथ मोडली त्याबद्दल क्षमा कर.. माझे घर सोडून जाण्यामागे आपल्या पुर्ण कुटूंबाचेच कल्यान आहे.. हे तुला माहीत आहेच ना ..
आणी माझ्यावर विश्वास ठेव मी जेथे असेल तिथे आनंदातच राहील.. आणी तु सुध्दा मोठ्या मनाने.. माझ्या ह्या निर्णयाचा स्वीकार करशील अशी मला खात्री आहे.
क्रुपा करुन मला शोधण्याचा सुध्दा प्रयत्न करु नका.. ही माझी विनंती नसुन आग्रह समजावा..
माझ्या नावची सर्व ईस्टेट मी वसु च्या नावाने करत आहे..
सर्व जनांस माझ्या कडुन पुढील आयुष्यासाठी शुभेछा आणी आशिर्वाद
तुमचा..
बाबा ..
"
ह्या घटनेनंतर तब्बल ३ आठवड्यांनी.. नमीताचे आ‌ई वडील आणी आजी आजोबा भेटायला आले..
नमीताचे वडील .. मि. देसा‌ई आणी आ‌ई दोघानांही खुप वा‌ईट वाटले होते... पण आजी आणी आजोबा .. ह्यानी प्रॅक्टीकल विचार करायला सुरुवात केली..
आजी: हे पहा आम्ही आता सरळच बोलतो जे बोलायला आलो आहोत ते..
दादा: अहो आजी.. आधी चहा वगैरे तरी घ्या.. आणी असे चिड्चिड कशाला करताय..
आजी: हे बघ तुझ्या आ‌ई ला बोलव आधी बाहेर
अमोघ ची आ‌ई बाहेर आली तेंव्हा त्या अगदी निर्विकार हो‌ऊन म्हणाल्या बोला.. काय बोलायचे आहे...
आजी: हे पहा हे लग्न जर व्हायचे असेल तर आमच्या काही अटी तुम्हाला मान्य कराव्या लागतील..
आ‌ई: काय अटी आहेत तुमच्या?
दादा:(मि. देसा‌ईंकडे बघुन) अटी म्हणजे???
आजी: ह्यांना कशाला विचारतोस मीच सांगते..
मि. देसा‌ई: आ‌ई तु आधी शांत हो.. मी सांगतो सगळे व्यवस्थीत..
आजी: तु चुप रे तुला स्वता: च्या मुलीचे काही चांगले वा‌ईट कळते की नाही.. आला मोठा सांगणारा शांत हो..
हे पाहा..
अश्या बदनाम घरात आम्ही मोठ्या मनाने मुलगी
द्यायला तयार झालो.. ऊपकारच आहेत ना आमचे तुमच्यावर..
पण आमच्या ह्या पोराला अक्कल नाहीये..
आम्हाला काय करायचे आहे तुमचे बाबा ईथे राहुत की नरकात.. तुमचा मुलगा आमच्या मुलीवर प्रेम करतो.. म्हनून आम्ही लग्न तरी करायला तयार आहोत..
लग्ना नंतर अमोघ ने ह्या घराशी काहिही संबंध ठेवायचा नाही..
अगदी भेटायला सुध्दा यायचे नाही.. ही अट मान्य असेल तरच आम्ही लग्न करु.. नाहीतर अख्ख्या समाजात आमची आणी आम्च्या कूळाची पण बदनामी हो‌ईल..
आ‌ई: हे पहा आजी .. आधीच आम्ही संकटात आहोत.. आणी त्यात आपली कुटूंब एक होणार म्हणजे आपण ह्या अडी अडचणी च्या काळात नको का साथ द्यायला एकमेकाला... आपण ह्यावर काहीतरी ऊपाय काढु..
आजी : हे पहा ही अट मान्य असेल तरच लग्न हो‌ईल नाहीतर नाही..
दादा (संतापुन) : आजी तुम्ही कोण लग्न ठरवणार्या आणी अटी घालणार्या.. आम्ही मुलाकडचे आहोत.. आणी बदनाम तर बिल्कुलच नाही आहोत..
चुका प्रत्येकाकडून घडतात .. बोलायला नको.. पण आता तुम्ही आमच्या खानदानाची बदनामीची गोष्ट करत आहात ना.. आणी उपकाराची..
तुमच्या सासर्यांनी जो पराक्रम केला आहे ना २ रखेल ठे‌ऊन हे पण अख्ख्या समाजाला माहित आहे.. आणी ऊपकाराची भाषा कोणाला करताय...
मि. देसा‌ई: हे पाहा तुम्ही जरा जास्तच बोलत आहात..
दादा: आम्ही जास्त बोलत आहोत.. हे पहा काका.. वेळ सगळयांवर असते.. आणी मला एक गोष्ट नक्की कळाली की तुम्ही फारच आपमतलबी आनी स्वार्थी लोक आहात..
तुम्हाला कुटूंब जोडणे आणी संस्कार करणे हा प्रकार माहीती आहे की नाही..
पुढील अर्धा तास शब्दाने शब्द वाढत होते..
सगळयात शेवटी अमोघ च्या आ‌ई म्हणाल्या..
आ‌ई: हे पहा देसा‌ई.. आम्हाला आपल्या अटी मान्य नाहीत.. किंवा तसे करणे शक्य नाही..
आणी माझा माझ्या मुलावर आणी मी केलेल्या संस्कारावर पुर्ण विश्वास आहे..
तेंव्हा मी एकदाच बोलते..
जर अमोघ ला ही अट मान्य असेल तर तुम्ही खुषाल लग्न जमवा.. या तुम्ही आता...
अमोघ ला जेंव्हा हे कळाले.. तेंव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकली.. नमीताने तर अन्न पाणीच सोडले..
शेवटी जेंव्हा नमीताच्या आ‌ईने घर सोडून जा‌ईल अमोघ च्या वडीलांसारखी अशी धमकी दिली.. तेंव्हा कुठे तिने जेवन सुरु केले..
अमोघ आणी नमीता ह्यांना आपा‌आपल्या कुटूंबा पुढे आपल्या प्रेमाची आहुती द्यावीच लागली..
तरी एकदा शेवटचा प्रयत्न म्हणुन दादाने.. देसा‌ई यांच्या घरी जा‌ऊन झाले गेले विसरुन जा आणी लग्न हो‌ऊद्यात अशी विनंती पण केली..
पण देसा‌ईनी त्याला पाणी सुध्दा न विचारता... परत पाठवले गेले..
दादा शेवटी ही पण ऑफर ठेवली.. हवे असल्यास मी माझी बायको वेगळे राहतो.. पण निदान आ‌ईला तरी आमच्या दोघांकडे राहु देत जा..
पण देसा‌ईंना आपल्या मुलीच्या होणार्या संसारापुढे झालेला अपमान जास्त सलत होता..
ते म्ह्णाले आता तुम्ही अगदी आमचे तळवे जरी चाटलेतना तरी हे लग्न हो‌ऊ नाही देणार..
झाल्या घटनांचा वहिनींना पण खुप त्रास झाला.. शेवटी त्यांना पण हॉस्पीटल मधे ऍडमीट करावे लागले..
नमीता त्यांना भेटायला तिकडे आली.. तिथेच अमोघ आणी नमीताची शेवटची भेट... झाली..
मोडलेल्या लग्नानंतर आणी त्या घरातील कटु आठवणी तसेच समाजातील लोकांचे टोमने सहन न झाल्यामुळे अमोघ ने पूण्यातल्या टी.सी.एस. मधे ट्रांस्फर मागुन घेतली
दादाने सुध्दा पुण्ञातच जॉब घेतला, आ‌ई वहीनी आणी हे दोघे असे कुटूंब पुण्यात स्थलांतर झाले..
ईकडे नाही म्हणटले तरी नवीन जॉब मधे सेटल होता होता दादा ला २ वर्ष गेली.. अमोघ ला पण प्रमोशन मिळाले..
अमोघ आणी दादाने बाबांना शोधायचे बरेच प्रकार करुन पाहिले.. पेपर मधे जाहिरात दे, पोलिस कंप्लेंट.. पण ह्याचा काही ऊपयोग नव्हता..
सरता सरता ४ वर्ष गेली.. त्यामधे एक वर्षा पुर्वी अमोघ ची आ‌ई लो बी.पी चा त्रास सुरु झाल्यामुळे झोपेतल्या झोपेतच गतप्राण झाली. ह्या
धक्क्यातुन ते कसे बसे सावरले होते..
तोच आज अमोघ ला नमीता भेटली होती.... आपण पाहिलेले स्व्प्न कधीच खरे होत नाही.. त्यामूळे स्व्पन पहावी पण त्यात गुरफटून जा‌ऊन सत्यात ऊतरवायचा प्रयत्न करु नये.. हे शाश्वत सत्य अमोघला ऊमगले होते..
त्याला जाणीव झाली.. की आपल्या साठी दादाने खुप काही केले आणी वहीनी अगदी लहान भावा सारखे आपल्यावर प्रेम करतात हीच आपली खरी संपत्ती आहे..
आपल्यावर आलेल्या संकट काळामधे आपल्याला नमीताच्या घरच्यांनी वाळीत टाकल्यासारखे वागवले.. तरी सुध्दा दादाने माझ्या सुखासाठी नमीताच्या घरच्यांची नको
तेवढी बोलणी खाल्ली.. आणी त्याबदल्यात मी काहीच दे‌ऊ नाही शकलो.. वहीनी ची पण काय चुक होती.. एका अपघाताने त्यांछे आयुष्य ऊध्वस्त झाले..
सगळी स्वप्ने एका क्षणात धुळीला मिळाली.. आता आज त्यांची ईछा आहे मी लग्न करुन ह्या घरात आनंद आणावा तर मी असे हेकेखोरपणे वागतो..
वहिनींने पसंत केली आहे म्हणजे मुलगी नक्कीच चांगली असनार.. आपल्या वहिनी आणी दादासाठी एवढे तर नक्कीच करु शकतो..
तसाच तो बेडरुम मधुन डोळे पुसत ऊठ्ला आणी अगदी आत्मविश्वासानी वहिनींला म्हणाला.. वहिनी तो फोटो बघु बर जळगावच्या मुलीचा...
वहिनींने गालातल्या गालात हसत.. तो फोटो त्याला दिला.. आणी थट्टा करत म्हणाल्या
एका मुलाला नको होते ना लग्न मग आम्ही त्यांना नकार कळवला .. आताच
अमोघः काय हे .. मला आधी फोटो तरी पाहु द्यायचात ना. ते काही नाही. आपण सगळे जायचे मुलगी बघायला.. ते पण ह्या विकेंडला.. तुम्ही करा तयारी..
कित्येक वर्षानंतर दादा आणी वहीनींला अमोघ च्या चेहर्यावर आज तो आनंद दिसला.. त्यानी लगेच पहायचा कार्यक्रम ठरवला..
अमोघ ने त्या मुलीला (वर्षा ला) आणी घरच्यांना झाल्या सर्व घटनांची कल्पना दिली.. मुलगी त्यालापण पसंत होती..
शेवटी त्यांनी पण एकदाचा होकार दिला.. अमोघ चा प्रामाणीकपणा वर्षाला खुप आवडला होता. ती एका शिक्षकाची मुलगी होती.. घरची परिस्थीती साधारण असल्यामुळे
तिच्या आ‌ईने काटेकोर पणे सर्व संसार केला होता.. आणी तेच वळन वर्षाला पण होते..
लग्नाचा मुहुर्त निश्चीत करण्यात आला..
आणी ज्या दिवशी अमोघ च्या घरात वर्षाने पा‌ऊल ठेवले. त्याच दिवशी अमोघ ला अमेरिकेत यायची संधी मिळाली होती
लक्ष्मी च्या पा‌ऊलांने वर्षा घरात आली होती..
अमोघ ने खुप मनाची तयारी करुन अमेरिकेला जायचा निर्णय घेतला. त्याच्या करियर च्या द्रुष्टीने त्याला अमेरिकेत जा‌उन येणे पण महत्वाचे होतेच..
तो अमेरिकेत आल्यावर २ महिन्यांनी वर्षापन अमेरिकेत आली.. तिच्या लाघवी स्वभावामुळे वहिनींना तिने केंव्हाच आपलेसे करुन घेतले होते..
तिने अमेरिकेत आल्यावर घरी बसुन काय करायचे म्हनुन सोसयल सर्विस करायचे ठरवले..
एन्,जे, मधील एका हॉस्पीटले मधे ती पेशंट च्या डेटा अप्लोड चे काम करत होती..
असेच १ महिनाभर काम केल्यानंतर अचानक एक केस तिच्या पुढे आली.. पॅरेलीसीस ची.. त्या हॉस्पीटलला एक तज्ञ डॉ . भेट देत होते..
त्यांनी बर्याच पॅरेलीसीच्या केसेस बर्या केल्या होत्या..
तिने घरी ये‌ऊन दादाला फोन केला आणी ईमेलातुन वहिनींचे सर्व केस पेपर मागुन घेतले..
अमोघ ला तर कळतच नव्हते ही काय करत आहे ते..
वर्षा त्या दिवशी ऊशीरा घरी आली.. ती पण खुपच एक्सा‌ईट हो‌ऊन..
वर्षा : अमोघ गेस व्हॉट.. :वहिनी बर्या हो‌ऊ शकतात.. येस अमोघ तुझा विश्वास नाही बसत ना.. माझा पण नाही बसत..
पण हे सर्व केस पेपर मी डॉ. ला दाखवले.. येस ही सेड शी कॅन वॉक ऑन हर लेग्ज...
आणी ऑपरेशन, फिजि‌ओ चा खर्च ३०००० डॉलर्स ईतका आहे.. पण मी मागच्या ३ मंथ्स पासुन तिकडे फ्री मधे सर्व्हीस केली ना.. म्हणून आपल्याला ६०% ऑफ देणार आहेत..
मीन्स फक्त १२००० डॉलर्स फक्त आणी फक्त ६ लाख.. वहिनींच्या आयुष्यापुढे ह्या पैशाची काय किंमत..
लेट्स डु ईट..
तु मेडीकल व्हिसा च्या तयारीला लाग मी अपॉ‌ईंटमेंट चे बघते..
अमोघ साठी वर्षा म्हणजे.. वाळवंटात फुटलेला पाण्याचा पाझर होता.. त्याला तिला कुठे ठे‌ऊ आणी कुठे नाही.. असे झाले..
दादा आणी वहिनी ला ही बातमी जेंव्हा कळाली त्यांचा पण आनंदाला पारावार ऊरला नाही..
वहिनींचे ऑपरेशन अगदी यशस्वी पणे पार पडले आणी आज चक्क त्या स्वता:च्या पायवर ऊभ्याराहु शकल्या..
अमोघ .. दादा आणी वर्षाचा आनंद तर गगणात मावेना.. राहुन राहुन त्यांना त्यांच्या आ‌ई आणी बाबांची आठवण येत होती..
वहिनींने आणी दादाने वर्षाचे पाय पकडौ लागले तेंव्हा वर्षा म्हणाली .. आपल्या मानसाठी एवढे करावेच लागते ना.. ऊदया माझ्यावर जर अशी वेळ आली तर तुम्ही पन असेच कराल ना..
तिचे हे वाक्य ऐकुन अमोघ ने तिला खुप घट्ट मिठी मधे घेतले...
त्यातच अमोघ ने आजुन एक गोड बातमी दिली.. तो बाबा होणार ह्याची.. सगळे जण भारतात १ वर्षात परतले.. अमोघला पण आता प्रमोश मिळाले..
आज जुन. २०१० मधे अमोघ ला मुलगी झाली.. जणू त्याच्या आ‌ईनेच पुन्हा जन्म घेतला आहे. असे सगळयांना वाटले..
ज्या दिवशी त्याला मुलगी झाली अगदी त्या दिवशी .. त्याचे बाबा पुण्यातल्या घरात परत आले.. ..
आणी पश्चातापाचे अश्रु , झालेल्या नातीचे आनंदाचे अश्रु, आणी वहिनी बर्या झाल्यात हे पाहुन मनोमन सुखावणारे अश्रु, त्यांच्या डोळ्यातुन वाहु लागले..
एका क्षणभंगुर दु:खी पर्वाचा अंत एवढा सुखावह हो‌ईल ह्याची अमोघ ला कल्पना सुध्दा करवत नव्हती... देव जे करतो ते आपल्या चांगल्या साठीच ... ह्यावर त्याचा पुर्ण विश्वास बसला.. आणी मनोमन त्यानी सिध्दिविनायकाला नमस्कार केला...
आज का कोण जाणे .. त्याला वाटले नमीताला आणी तिच्या मिस्टर अमित ला आपल्या मुलीच्या बारश्यासाठी बोलवावे.. त्यानी वर्षाला तसे बोलुन दाखवले.. तिने पण मोठ्या मनाने.. होकार दिला.
अमोघ ने नमीताला फोन केला
अमोघः हाय.. नमीता आहे का?
नमीता: हो बोलतेय आपण कोण?
अमोघः मी अमोघ काळ्दाते...
नमीता: (आवाज ओलावुन) अमोघ... तु कुठे आहेस.. ई नीड यु.. आय नीड सम हेल्प..
अमोघ: काय झाले नमीता.. आर यु ओके.????
नमीता: अमित अँड आय अँम गेटींग डायव्होर्स्ड.... त्याच्या कंपनी मधल्या मुलीबरोबर तो लग्न करतोय..
अमोघ : तुझे बाबा?? अग ते लॉयर आहेत ना.. बघ ते काय म्हणतात..
नमीता : ( रडत रडत) अमोघ.. बाबांना अन्ननलिकेचा कॅन्सर झाला आहे.. तिसर्या स्टेज मधे आहे.. फार तर फार २ महिने जगतील..
अमोघः आय ऍम सॉरी टु हियर धिस.. मी बघतो.. काय मदत करता ये‌ईल ते...
अमोघला ज्या अग्निदिव्यातुन जावे लागले होते.. त्या पेक्षा कितीतरी अधीक पटीने आता नमीता आणी तिचे कुटूंब
एका क्षणभंगुर दु:खाला सामोरे जाणार होते...
समाप्त...
तळ्टीपः
(लेख हा एका सत्यकथेवर आधारीत आहे.. केवळ अमोघ चे बाबा आणी वहिनी ह्यांचे कॅरेक्टर आणी घट्ना थोड्याश्या बदलुन लिहिल्या आहेत) ..