कामथे काका (भाग तेविसावा )

काका घरी गेले. नीता काहीतरी वाचीत बसली होती. उद्या रविवार होता. निदान उद्यापुरता तरी     बँक चॅप्टर क्लोज होता. त्यांनी गेल्या गेल्या श्रेयाला उचलून घेतलं. ते नीताला म्हणाले, " चल मी हिला बाहेर घेऊन जातो.   ते ऐकून नीता म्हणाली, "आत्ता? जेमतेम चार वाजतायत. पावसाळी हवा असली तरी ही वेळ फिरण्याची नाही. " मग त्यांनी श्रेयाला खाली ठेवलं आणि ते  कपडे बदलायला गेले. चहा घेऊन ते गॅलरीत उभे राहिले. उद्या आपण काय करणार आहोत? त्यांनी स्वतःला विचारले. साधनाकडे तर ते जाऊन आले होते. सोमवारशिवाय बँकेबाबत काही विचार करण्याची आपल्याला गरज नाही. मग त्यांना एक विचित्र शंका आली. दरवेळेला दादा आपल्याला त्याच्या कोणत्याही धंद्यांपासून बाजूला का ठेवतो. आतासुद्धा त्याने दरोड्याच्या दिवशी त्यांना बरोबर न घेण्याचं ठरवलं होतं. दादाचा  आपल्याबाबत नक्की विचार काय आहे? ते अंदाज बांधू लागले. का तो आपल्याला काही काम नसताना पगार देतोय? एक मात्र त्यांना आश्चर्य वाटलं, की दादाने आणखीन दोन बँकांमध्ये त्यांना पाठवून वेगवेगळ्या नावांनी खाती सुरू केली होती. त्यांचा उपयोग त्याला काय आहे त्यांना कळेना. असं तर नाही? येणारा दोन नंबरचा पैसा त्यांच्या त्या खात्यांमध्ये तो थेट तर मागवीत नसेल? त्यांची शंका बरोबर होती. फक्त तो ते पैसे थेट  मागवीत नव्हता तर कुणाला तरी सांगून त्यांच्या खात्यांमध्ये भरीत होता. तेही त्यांच्या नकळत. हा अंदाज मात्र त्यांना आता आला नव्हता. दादाचा  विश्वास सूर्यावर कमी होता. पण काकांना तर तो त्याचा उजवा हात वाटत होता. असो. काकांच्या सहकारी बँकेच्या खात्यात जवळ जवळ लाखाच्यावर थोडी शिल्लक जमली होती. त्या मानाने कमी कालावधीत हे सगळं झालं होतं. त्यांच्या मनात आलं हेच पैसे घेऊन आपण आत्त्ताच पळून गेलो तर? साधनाचा विचार करूच नये. पण लाख सव्वालाख रुपये असे किती दिवस त्यांना पुरणार होते? या विचारांनी ते विचलित झाले.   मग त्यांना अचानक दादाने पुढच्या शनिवारी मीटिंग ठेवल्याचं आठवलं. तेव्हा तो काय ठरवणार? तसंच असल्या सहकारी बँकेत तीस चाळीस लाखाची रोकड दर आठवड्याला कशी काय जमत असेल? कुठे तरी गफलत आहे. दादाला ही हे माहीत असावं. दादाने इतर बँका सोडून हीच बँक का निवडली. दुसरा तर काही हेतू नाही? त्यांची बुद्धी फार चालेना. मग ते दमले आणि चहाचा कप आत नेऊन ठेवून आजचा पेपर  उघडून वाचीत सोफ्यावर बसले. अजूनही पाच वाजून गेले नव्हते. पावसाची काळोखी पसरली होती. होती.          

      इकडे दादाच्या ऑफिसमध्ये सूर्या, अकडा त्याचे त्याच इतर सहकारी यांचा खल चालू होता. सूर्या म्हणाला, " दादा ये बँक लूटनेकी क्या जरूरत है? हमेशाकी तऱ्हा अपना धंदा मस्त चल राहा है..... " थोडा वेळ जाऊन देऊन दादा म्हणाला, " चालू धंदोमे पुरी जिंदगी काटनेका इरादा है क्या? दिनबदिन पुलिस सख्त हो रही है. अपने खबरी भी अब शाणे बन गये है. अब रंडीके धंदेमे भी पहले जैसा नही राहा. गुड्डी बोल राहा था श्रीपतरायसे बचके रहना. अपना धंदा हडपनेकी कोशिश कर राहा है. मै सिर्फ उसे रंगेहाथ पकडना चाहता हूं. अब बडा हाथ मारना होगा...... " काही वेळ कोणीच काही बोलले नाही. मग सूर्या म्हणाला, " बडा हाथ मारके चूप बैठेगा क्या? पुलिस चूप बैठने देगी? " दादाने वेळीच विषय बदलला.. " कलतक एरिक क्या करता है देखते है, फिर सोचेंगे...... मग अकड्याकडे वळून म्हणाला, "तुम ये बूढीका एक दो दिनमे फायनल करो. तुम्हे क्या तकलीफ है विरारकी खाडीमे फेकनेमे? बह जायेगी तो अच्छा है, इतना बूढीसे प्यार हुआ होगा तो घर ले जा. " बाकीचे बेतानेच हसले. अकडा मात्र दबकत म्हणाला, " सोच राहा हूं मुंब्राकी खाडीमे फेक आऊ उसमे नजदीक जाके फेक सकता है. " वैतागून दादा म्हणाला, " तेरा दिमाग हमेशा घास खाता है. जो बोला   वही करना" असं जरी तो बोलला असला तरी दहा पंधरा मिनिटं स्तब्ध वसल्यावर त्याला एक गमतीदार कल्पना सुचली. त्याने ती बाकीच्यांना सांगितली. ते एकदम चमकले. पण त्यासाठी अजून पुढच्या शनिवार पर्यंत म्हातारीला खालच्या भुयारात ठेवणं भाग होतं...... दादा जागेवरून उठणार तेवढ्यात त्याचा मोबाईल वाजला. " तू बडा आराम फर्मा राहा है? पंधरा नंबरका क्या किया भोसडिके? देख  मै जलदीही छूटनेवाला हूं. तेरेको बोलके मैने गलती किया "...... फोन बंद झाला. दादाला शिवी देणारा त्याच्या टक्करचा असावा किंवा त्याचा बाप तरी. दादाला बोलण्याची त्याने संधीच दिली नाही. दादा गंभीर झाला. त्याने पुढच्या प्लानसाठी काकांना बोलवण्याचे ठरवले. तो योग्य संधीचा विचार करू लागला. रात्रीचे दहा वाजत असावेत. त्याला एकदम गुड्डीची आठवण झाली. त्याने सूर्याला बरोबर घेण्याचे ठरवले. बाहेरच्या हॉलमध्ये काम करीत असलेल्या सूर्याला त्याने बरोबर चलण्याचा इशारा केला. ते दोघे गाडीत जाऊन बसले. गाडी फॉकलंडरोड नाक्याकडे निघाली.

        हॉटेल डिलाइट आज खच्चून भरलं होतं. सर्वच टेबलं स्त्री पुरुषांनी बहरली होती. प्रत्येक टेबलावरील दिव्याच्या मंद प्रकाशात त्यांचे अर्धवट उजळलेले, अर्धवट अंधारलेले चेहरे आणि टाचक्या टिचक्या कपड्यातून दिसणारी अर्धी उघडी शरीरे कोणत्याही छाया प्रकाशाच्या खेळापेक्ष कमी नव्हती. म्हंटलं तर दिसत होतं, म्हंटलं तर दिसत नव्हतं अशा वातावरणात येणाऱ्या वेगवेगळ्या विक्षिप्त वासांना  जिवंतपणा आला होता. दादाची गाडी हॉटेलसमोर थांबली. पण नेहमीप्रमाणे हात जोडीत श्रीपतराय आतून आला नाही. तो गिऱ्हाईकांची खबर घेत असावा. किंवा तो दादा आल्याचे समजूनही न समजल्यासारखे करीत असावा असे दादाला वाटले. आलेली सणक दादाने दाबली. त्याच्या मनात आलं 'दो टकेका चायवाला भैया स्साला'. पण तो काही न बोलता सूर्याला घेऊन मधली गर्दी बाजूला सारीत आत शिरून तडक पहिल्या माळ्यावरच्या गुड्डीच्या ऑफिसकडे निघाला...... गुड्डी आरामात बसून ब्लू फिल्म पाहत पुढ्यातली बियर रिचवीत होता. त्या दोघांना आत शिरलेले पाहून तो चांगलाच गडबडला. फिल्म बंद करण्याचा खटाटोप करीत तो स्वतःला सावरू लागला. त्याची लगबग पाहून दादा चिडला..... "काम करता भी है कभी?, चल श्रीपतको बुलाव, मेरा जिकर नही करना. " गुड्डीने घाईघाईने श्रीपतला फोन लावला.

गिऱ्हाइकी पाहण्यात मग्न असलेल्या श्रीपतने येतो म्हंटले. त्याला अंदाज आलाच होता. तो काही विचारणार तेवढ्यात गुड्डीने फोन बंद केला. तसाही दादाने आणलेला आणि कौतुक केलेला, त्याच्यावर नजर ठेवणारा हा लांडा त्याला आवडत नव्हता. त्याला गुड्डीचा राग आला. गेल्याबरोबर गुड्डीला त्याने फैलावर घेण्याचे ठरवले. पैशातला कट देऊनही शेवटी तो उलटला होता..... दादा म्हणाला, " स्साला तुम लोगोंको बहोत छूट दी मैने...... " दादासाठी ड्रिंक बनविणाऱ्या गुड्डीला आता काही तरी भयंकर होणार असं वाटू लागलं. थरथरतच त्याने ग्लास समोर ठेवले.

      दादा ग्लास तोंडाला लावणार तेवढ्यात हलता दरवाजा लोटून श्रीपतराय आत येत गुड्डीला म्हणाला, "अरे यार, कायकू बुलाया? गिऱ्हाईक छोडके आना पडा ना. और....... " पुढे तो काही बोलणार तेवढ्यात त्याची नजर दादाकडे गेली. का कोण जाणे त्याला पाहून तो थोडा बावचळला. त्याला अशी अपेक्षा होतीच  पण ती खरच खरी निघेल इतकी खात्री त्याला नव्हती. खरतर गुड्डीचा फोन आल्यावर त्याने ते ओळखायला पाहिजे होतं, पण बेफिकिरीमुळे तो गाफील राहिला. कपाळावर जमणारा हलकासा घाम खांद्यावरील फडक्याने पुशीत तो तसाच उभा राहिला. दादाने सणकून विचारले, " क्यूं श्रीपत फिरसे रास्तेपे चाय बेचना चाहता है क्या? कीडेकी अवलाद साली. " आणि तो बाजूला पचकन थुंकला. त्याच्या अंगावर धावून कानफटीत भडकावीत तो ओरडला, " हमे गुमराह करने लगा क्या? साले भडवे. "  श्रीपतने वेदनेने गाल धरून ठेवला. त्याला गुड्डीने चुगली केल्याचे जाणवले. गुड्डीला खुन्नस देत तो म्हणाला, " कैसी बात करते हो दादा, ऐसा  कभी होगा क्या? ".... दादा खुर्ची मागे ढकलीत म्हणाला, "अपनीही रंडियोंसे यहाँ बैठनेका पैसा लेते हो तुम? वो साली क्या धंदा करेगी, और क्या हमे देगी? भोसडिके भाडखाऊ! " असे म्हणून त्याने श्रीपतची कॉलर धरली आणि आपला दुसरा हात वर करीत तो पुन्हा त्याला मारणार तेवढ्यात दाराबाहेरील हालचाल पाहून तो ओरडला, " कौन है उधर?..... " सूर्याने चटकन पिस्तुल काढून हातात धरले.

हलणारा दरवाजा हळूच उघडला. पेरियरच्या टोळीतले दोघेजण हातातली पिस्तुले दादावर  रोखत  आत शिरले आणि म्हणाले, " आज से ये धंदा पेरियरका है, श्रीपतसे खरीद लिया है समझे. " फसवलं गेल्याच्या जाणिवेने लाल पिवळा होत दादाने आणि सूर्याने आत शिरलेल्या दोघांवर झडप घातली. आणि पिस्तुल धरलेले हात पिरगळले. दादाने एकाच्या पोटात इतक्या जोरात लाथ मारली की त्याला उलटी झाली.

दुसऱ्याच्या तोंडावर सूर्याने फाइट मारून त्याचा गळा एका हाताने इतका आवळला की तो गुदमरल्यामुळे खाली कोसळला. मग दादाने श्रीपतला पेरियरला फोन लावण्यास सांगितले. श्रीपतने थरथरत्या हाताने पेरियरला फोन लावला आणि दादाच्या हातात दिला. दादा म्हणाला, " तूने क्या नया धंदा चालू किया क्या, आदमी फोडनेका? तेरेकू क्या लगा? तु ये धंदा खाके डकार देगा और हम कुछ नही करेंगे? " त्याला मध्येच तोडीत पेरियर म्हणाला, " ए शाणे शाणा बन. तेरा श्रीपतही आया था मेरे पास भीक मांगने. गद्दारोंकी टोली है तेरी, जो तूने मेरे आदमीयोंके साथ किया ना उसकी तो तू कीमत चुकाएगा मांके..... " आणि फोन बंद झाला.

        सूर्या म्हणाला, "दादा इन दोनोंका क्या करे? "   दादाने थोडा विचार करून सांगितले, "अभी तो अपने पास टाइम कम है, गुड्डीको बादमे देख लेंगे फिलहाल श्रीपत को लेके जाते है. " हे ऐकल्यावर श्रीपत घाबरून म्हणाला, " मै अब किधरभी नही जायेगा. "   दादा चिडून म्हणाला, " तू क्या, तेरा बापभी जायेगा" सूर्याला खूण करून तो म्हणाला, " चल इसको लेके गाडीमे जाके बैठ. मेरेको गुड्डीके साथ बात करनी है. " सूर्याने श्रीपतचे केस पकडले आणि ओढत म्हणाला, " चल ए, हरामी, पाव उठा तेरे, पावमे क्या शिशा भरा

है क्या?....... " तरीही तो प्रतिकार करीत राहिला. मग सूर्याने पिस्तुल काढून रोखले. म्हणाला, " अब भी नही चलेगा? "आता, मात्र कुरबुरत का होईना तो चालू लागला. ते गेल्यावर दादा म्हणाला, " गुड्डी अब ये होटल तेरेकोही देखना है. जो गलती श्रीपातने की वो अब तू नही करना. और मेरेको एक लाख रुपिया जुर्माना अभी के अभी देनेका. "...... घाबरून गुड्डी म्हणाला, "लेकीन दादा इसका गलती की शुरुवात तो अभी कई दिनोसे हुई है, आप जरा सोचके जुर्माना लगाईये, वरना मै तो बर्बाद हो जांउंगा. " दादा म्हणाला, " वो मै कुछ नही जानता, सजा सजा होती है. जिंदा छोड राहा हूं. सोल्याकोभी नही बुला राहा हूं, समझे चल चल पैसा निकाल. "........ "दादा थोडी मोहलत तो देदो, अभी इतना पैसा तो मेरे पास नही है. "   जा कौंटरसे लेले या कहीसे भी ले. " दादा हटत नाही असे पाहून तो गेला. कुठून कोणास ठाऊक पण त्याने एक लाखाची रोकड पैदा केली. आणि दादाला दिली. मग दादा रोकड घेऊन गाडीत जाऊन बसला. खरतर त्याला आज नवीन आलेल्या पोरीचं उद्घाटन करायला बोलावले होते. तिकडे मावशीला फोन करून त्याने उद्या येण्याचे आश्वासन दिले. गाडी पुन्हा सूर्याच्या ऑफिसकडे निघाली. ऑफिसमध पोचल्या पोचल्या त्याने श्रीपतला एक लाथ घातली आणि सोल्याला फोन केला. "सोल्या, कल रातको आ जाना बीस हजार का काम है "..... सोल्याचे रेट ठरलेले होते. नुसती दहशत आणि एखाद दोन बोटांची चटणी असेल तर वीस हजार. अवयव सोलायचा असेल तर पन्नास हजार. चेहरा सोलायचा असेल तर एक लाख आणि हे सर्व करून मारायचे असेल तर पाच लाख. दादाने गुड्डीकडून पैसे उगाचच घेतले नव्हते. सध्या श्रीपतला वीस हजाराची शिक्षाच पुरेशी आहे हे तो जाणून होता. श्रीपतला मात्र माहीत नव्हते, हा सोल्या कोण आणि तो काय करणार, त्यामुळे तो सूर्या आणि दादाला शिव्या देण्यात मागे पुढे पाहत नव्हता.

    (क्र म श :)