वॉशिंग्टन डीसी मेट्रो एरिया सहल - भाग ३

भाग १, भाग २

ओल्ड पोस्ट ऑफिस पाहून झाल्यावर वॉशिंग्टन मॉन्युमेंटच्या दिशेनं चालू लागलो. खरेतर युनियन मेट्रो स्टेशनच्या समोरून सुटणार्‍या बसेस नॅशनल मॉलचा भाग फिरवून आणतात. इथेच सर्व मॉन्युमेंट्स आहेत. तसेच हॉप ऑन हॉप ऑफ टूर्सचा लाभ घेतला जाऊ शकतो. आम्ही मात्र ऐनवेळेवर काहीतरी घोळ घालून या सुविधा वापरल्या नाही आणि खूप पायपीट केली. तर मग रमत गमत डी सीतील थोडी बोचरी गार हवा झेलत वॉशिंग्टन मॉन्युमेंटच्या दिशेने चालत राहिलो. रस्त्यात नॅशनल म्युझियम ऑफ आफ्रिकन अमेरिकन हिस्टरी  अ‍ॅन्ड कल्चर लागले. या इमारतीचे उद्घाटन गेल्या वर्षी २४ सप्टेंबरला तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या हस्ते झाले होते.या नेहमीपेक्षा खूपच वेगळ्या वाटणाऱ्या इमारतीचे बाहेरून निरिक्षण करून आम्ही शेजारीच असणाऱ्या वॉशिंग्टन मॉन्युमेंटला पोचलो. आता वातावरण एकदम झाकाळून आले होते.

दुवा क्र. १एअर फोर्स वन या अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या अधिकृत विमानाबाबतही असतो. 
आम्ही लांबून थोड्या वेळ निरीक्षण केले. अजूनही काही हेलिकॉप्टर परत निघायची चिन्ह दिसेनात. मग व्हाइट हाउस जवळील पर्यटकांची गर्दी वाढू लागली होती. आम्ही असे ठरवले की वॉशिंग्टन मॉन्युमेंट पाहायला पुन्हा नंतर यावे आता मोर्चा व्हाइट हाउसकडे न्यावा ;-) . व्हाइट हाउसला लागून असे मोठे मोकळे मैदान आहे तिथे बरीच गर्दी जमली होती. आम्हीही त्या बघ्यांच्या गर्दीत सामील झालो. मग लक्षात आले की आज तर शुक्रवारची संध्याकाळ आहे राष्ट्राध्यक्ष आणि प्रथम कुटुंब त्यांच्या मार ए लागो च्या रिसॉर्टवर विकांताला राहायला निघाले होते. सुज्ञांना व्हाइट हाउस पाहायला कधी जावे हे वेगळे सांगायला नको. लवकरच प्रथम कुटुंब हेलिकॉप्टर मध्ये विराजमान झाले आणि जॉइंट बेस अ‍ॅन्ड्रुजला रवाना झाले जेथून ते फ्लोरिडाच्या वेस्ट पाम बीच येथे एअर फोर्स वन विमानाने जाणार होते.     हेलिकॉप्टर साऊथ लॉनवर उतरताना आकाशातून काढलेला हा फोटो विकीवरून साभार. तसेच टचडाऊनपूर्वीचा हा फोटो जालावरून साभार. जिथे हेलिकॉप्टर उतरले होते व्हाइट हाउसच्या त्या मागील भागाला साऊथ लॉन असे म्हणतात. लांबून जरी हा भाग लहान वाटत असला तरी प्रत्यक्षात मात्र साऊथ लॉन्स अतिशय भव्य आणि तितकेच आखीव रेखीव आहे. मग आम्ही तिथे असलेल्या कुंपणाजवळ फोटो काढायला गेलो. इथे व्हाइट हाउसकडे  पाठ करून अनेक फोटो काढले. समोरच वॉशिंग्टन मॉन्युमेंट दिसत होते. व्हाइट हाउस अनेकदा टीव्ही आणि फोटोंमधून पाहिले होते. मात्र इतक्या जवळून प्रथमच पाहिले असल्याने खूप छान वाटले. आमची मुलगी त्या कुंपणाला धरून उभी होती. ते तिला इतके आवडले की ते सोडायला तयार नव्हती. खालचे दोन फोटोज जालावरून साभार.साउथ लॉनकडून व्हाइट हाउसला वळसा घालून जाताना जे उद्यान लागतं तिथला एक फोटो 
आता जाणून घेऊया थोडे व्हाइट हाउसच्या स्थापत्या विषयी. व्हाइट हाउस चे डिझाइन आयरिश आर्किटेक्ट जेम्स होबान यांचे आहे. सन १७९२ ते १८०० सालापर्यंत याची मूळ वास्तू बांधली गेली. सन १८०० साली पहिल्यांदा राष्ट्राध्यक्ष जॉन अ‍ॅडम्स हे व्हाइट हाउस मध्ये राहिले. तेव्हापासून आजवरच्या सर्व राष्ट्राध्यक्षांचे अधिकृत निवासस्थान व्हाइट हाउसच आहे. मूळ वास्तू बांधून पूर्ण झाल्यावर त्यात नंतर वेळोवेळी यात भर घालण्यात आली. १८१२ साली सुरू झालेल्या ब्रिटिश अमेरिकन युद्धादरम्यान १८१४ साली ब्रिटिश सैनिकांनी लावलेल्या आगीत व्हाइट हाउसचा आतील भाग जळून गेला. तसेच या आगीत बाहेरील भागाचेही नुकसान झाले. पुन्हा बांधणीचे काम अगदी लगेच चालू झाले होते.राष्ट्राध्यक्ष विल्यम हॉवर्ड टाफ्ट यांनी वेस्ट विंग वाढवून प्रथमतः ओवल ऑफिस निर्माण केले. हा काळ होता १९०९ सालचा. १८१४ साली लागलेल्या आगी नंतर व्हाइट हाउस असे दिसत होते. हा फोटो विकीवरून साभार.व्हॉइट हाउसचा सगळ्यात पहिला ज्ञात फोटो १८४६ साली John Plumbe यांनी काढला आहे. हा फोटो विकीवरून साभार.राष्ट्राध्यक्ष जॉन अ‍ॅडम्स हे जेव्हां राहायला लागले व्हाइट हाउस मध्ये त्यावेळी त्यांनी आपल्या पत्नीस एका पत्रात लिहिले की: "I pray Heaven to bestow the best of blessings on this House, and all that shall hereafter inhabit it. May none but honest and wise men ever rule under this roof." या ओळी राष्ट्राध्यक्ष फ्रँकलीन डी. रुझवेल्ट यांनी स्टेट डायनिंग रूम मध्ये एका मॅन्टलवर(हर्थवरील आधाराचा बीम) कोरून ठेवली आहेत. माजी फर्स्ट लेडी जॅक्लीन केनेडी यांनी काही महत्त्वपूर्ण सजावट त्यांच्या कार्यकाळात व्हाईट हाउस मध्ये केली. यात अनेक धनिकांनी मौल्यवान चित्रे तसेच फर्निचर इत्यादी वस्तू व्हाईट हाउस सजवण्यासाठी दान दिले. आश्चर्याची बाब अशी की यात एक अँटीक वॉलपेपर देखिल डिप्लोमॅटिक रूम सजवण्यासाठी वापरला गेला. हा वॉलपेपर एका आलिशान महालात वापरला होता १९६१ सालापर्यंत. हा महाल जमीनदोस्त केला गेला एका दुकानाच्या बांधकामासाठी. मात्र अगदी महाल पाडण्या आधी हा वॉलपेपर व्हाइट हाउसला विकला.कालांतरात अनेक सुविधा व्हाइट हाउस मध्ये भर टाकत गेल्या. जसे की अपंगासाठी सुलभ प्रवेशद्वार. तसेच पहिले संगणक आणि प्रिंटर इत्यादी.व्हाइट हाउसच्या वेस्ट विंग मध्ये ओवल ऑफिस आहे. जिथे राष्ट्राध्यक्षांचे ऑफिस आणि त्यांच्या सीनियर ऑफिसर्सचे कार्यालय आहेत. तसेच ईस्ट विंग मध्ये प्रामुख्याने फर्स्ट लेडीचे ऑफिस आहे.पुढे आम्ही चालत व्हाइट हाउसच्या उत्तरेकडील प्रवेशद्वाराच्या दिशेने जाऊ लागलो. काही वर्षांपूर्वीपर्यंत पेनसिल्वेनिया ऍव्हेन्युवर व्हाइट हाउस समोर पर्यटकांना उभे राहू दिले जात होते. आता पर्यटकांसाठी तिथे मुक्त प्रवेश नाहीये. त्याऐवजी व्हाइट हाउससमोरच्या उद्यानाजवळ (लाफेयट स्क्वेअर) गेल्यास तिथून व्हाइट हाउसची समोरची बाजू दिसू शकते. आम्हीही तिथे पोचलो. इथेही अनेक पर्यटकांची बरीच गर्दी होती. बरेच लोक फोटो काढत होते. तर काही लोक तेथील सुरक्षा कर्मचार्‍याना विचारत होते की "राष्ट्राध्यक्ष परत कधी येणार व्हाइट हाउस मध्ये?" ते कर्मचारी देखील न कंटाळता प्रत्येक वेळी नम्रपणे "आम्हाला काही त्याची कल्पना नाही" असे सांगत होते! इथेही काही भव्य पुतळे तसेच कारंजी आहेत. इथली हिरवळ अतिशय आखीव रेखीव आहे. इथे जाणवलेली आश्चर्याची बाब म्हणजे व्हाइट हाउसचा हा भाग डी सी शहरात गर्दीने गजबजलेल्या ठिकाणी आहे. व्हाइट हाउसच्या अगदी जवळच लागून अनेक मोठ्या बँकांची कार्यालये तसेच इतर अनेक व्यावसायिक कार्यालये आहेत. शिवाय एक बस थांबाही आहे. जिथे अनेक सिटी बसेस रांगा लावून उभ्या होत्या. संध्याकाळच्या वेळी इथे कुठल्याही शहराच्या मध्यवर्ती भागात असते तशीच वर्दळ होती. या ठिकाणी आम्ही लांबून काढलेले काही फोटोज. या परिसराची कल्पना येण्यासाठी गूगल अर्थवरून घेतलेला हा स्क्रीनशॉटअमेरिकेचे नागरिक असाल तर पूर्वनियोजित वेळ घेऊन व्हाइट हाउस आतूनही पाहता येते. तसेच अमेरिकेचे नागरिक नसाल तर आपल्या देशाच्या दूतावासाशी संपर्क साधून पाहता येते (हे मात्र किती सहजतेने होऊ शकते याची कल्पना नाही). या दिवसाच्या भटकंतीचा शेवट आम्ही इस्ट कोस्टमधल्या एका कॅफे चेनच्या (प्रेट) कॅफे मध्ये कॉफी व Croissant चा आस्वाद घेऊन केला.  बोचरी हवा आणि अपुरा सूर्यप्रकाश यामुळे थोडे नाउमेद वाटत होते. मात्र ऐतिहासिक डी सी शहर पाहायला लागल्यावर मात्र ही उणीव भासली नाही. आजचा दिवस अनपेक्षित गोष्टी पाहायचा होता. त्यात क्लॉक टॉवर आणि प्रथम कुटुंबाला घेऊन जाणारे हेलिकॉप्टरचे उड्डाण पाहायला मिळाले. एकंदरीतच डीसीच्या पहिल्या दिवसाच्या भटकंती मध्ये ही स्थळे प्रत्यक्षात पाहून आनंद वाटला. उर्वरित सहल अशीच चांगली पार पडेल याची खात्री वाटली.व्हाइट हाउसचा नॉर्थ लॉनवरुन काढलेला हा फोटो जालावरून साभार. 
माहितीचा स्रोत: विकी
क्रमश: