"पाऊस कोसळू दे" वरून मला सुचलेले काहीबाही. या रचनेला गझल, हझल, विडंबन
कश्याच्या दावणीला बांधावे ते कळले नाही त्यामुळे मोकाट/संदिग्ध झाली आहे.
पाऊस कोसळू दे
छपरातुनी गळू दे
घाई कुणास आहे?
तू दे, हळूहळू दे!
बगळ्यास मान दे अन्
हंसास कावळू दे
दे बैल दे कधी दे
गायी कधी वळू दे
पाहून या दिव्याला
सूर्यास काजळू दे
सावर मला जरासे,
थोडे घरंगळू दे!
"मूर्खांस टाळणे" हा
सन्मार्ग, मज कळू दे
प्रेरणा - पाऊस, पाऊस कोसळू दे