वाटतो आहे जरी बकवास मी

आमची प्रेरणा प्रसाद यांची सु रे ख गझल वेदनांची मांडतो आरास मी!

वाटतो आहे जरी बकवास मी
आणले पोलिसांना जेरीस मी


पाहतो ती ती घरे मी फोडतो
कुलपे तोडीत आहे खास मी


का अचंबा वाटतो मज पाहूनी?
केलाय घरफोडीचा अभ्यास मी


झोपले सरकार ही.. पोलिस ही
मोकळा फिरतो इथे सर्रास मी


वेळ जो थोडा मला तो लागला
झोपले सारे केला विश्वास मी


यायचे होते तिला आलीच ती
थांबवू शकलो ना शिंकेस मी


चूक ती पडली जरा भारी मला
भोगला एकदाच कारावास मी


ओळखू येणार ना आता कुणा
होऊनी मंत्री बदलला इतिहास मी


चुकतो जरी अजूनी वृत्तांत इथे
लाजतो ना विडंबने करण्यास मी

-(निर्लज्ज) अनिरुद्ध अभ्यंकर