वेळ झाली-२

आमची प्रेरणा सुवर्णमयी यांची कविता वेळ झाली

बायकांची बायकांशी भांडण्याची वेळ झाली
रोजची पाणी नळाला सोडण्याची वेळ झाली


ही पहा हो शब्द आता उधळण्याची वेळ आली
एकमेकीचीच डोकी फोडण्याची वेळ झाली


वेळ झाली किती पण ठाण हा मांडून मेला
काय ही अंघोळ येथे घालण्याची वेळ झाली?


ह्याच वेळी बादल्या का भरून ह्या घेता बयांनो
घासली भांडी कधीची विसळण्याची वेळ झाली


"केशवा"ला घागरी ह्या एकदा तरी भरूद्या
बायको त्याची घरी जागण्याची वेळ झाली


पाहता येथे नवी कविता कसा मी गप्प राहू?
हाल हे तुम्ही नव्याने सोसण्याची वेळ झाली!!


 केशवसुमार.