बोलली१ कुठे बायको |
म्हणाली नको |
फक्त डोळ्यांनी ||
मधुनीच बयेचा घोळ |
पोरकल्लोळ |
वीट कानास ||
बाहेर उभा२ सासरा |
जरा घाबरा |
धाक सासूचा ||
इतक्यात रडावे मूल |
तशी चाहूल |
बायकोला ये ||
पेढ्यांत घातला खवा |
तसा गोडवा |
गोडवा कोण ||
बाहेरी संयम फार |
घेत आकार |
आत शृंगार ||
१. भांडली आधीच्या आवृत्तीत.
२. खडा आधीच्या आवृत्ती.
बैरागी ह्यांच्या वाजला किती पाऊस... वर आधारित