मित्रांन्नो.........मी हे जे लिहिलय ते माझ्या आधीच्या लिखाणातल्या
कमीपणाला कदाचीत भरुन काढेल....
हे जे लिहिलय ते एका कवितेला उद्देशुन लिहिलय.........
माझ्या त्या कवितांना मी पुन्हा नवं आयुष्य देण्याचा प्रयत्न करतोय..............
तुला मी आता नवं आयुष्य देणार...................
नाही देऊ शकलो गं आजवर मी तुला प्राण
तुझ्या महतीने आजवर होतो मी अजाण
शब्दांच्या पुसटश्या अस्तित्वाने तु भटकत होतीस
माझ्या नादानपणाने तु तडपत होतिस
मला नव्हते तुझ्या बद्दलचे पुर्ण ज्ञान
केलंस तु खुप काही सहन
त्या वेदनेची मलाही नव्हती आजवर जाण
पण........
तुला मी आता नवं आयुष्य देणार
जेव्हा प्रेमाची सुटली साथ माझ्या जीवनातुन
तेव्हा वेदनेची पहीली सर बरसली या नभातुन
कदाचीत तेव्हाच तुझा जन्म झाला
पण नियतीने परत माझ्याशी घात केला
पहील्याच प्रयत्नात
माझ्याकडुन तुझा विच्छेद झाला
तरी पण मी तुला जाणुन घेण्याचा
पुन्हा प्रयत्न करणार..........
तुला मी आता नवं आयुष्य देणार...................
जे शब्द तुला देऊ शकतात सांगता
त्यान उमटवण्याची माझ्याकडे कुठे होती क्षमता
तुला नटवायला शब्दांची आभुषणे लागणार
पण त्यावेळी
मी तर होतो दरीद्री मग मी तरी ती कुठुन आणणार
आता मी तुला नव्या शब्दांच्या अलंकारान्नी मढवणार
तुला मी आता नवं आयुष्य देणार...................
आजवर फ़क्त मी मरणावर लिहिलं
तुझ्यातल्या जीवाला पेटत्या सरणावर सोडलं
आता मी तुझी ती राख चाळुन काढणार
त्या राखेतल्या तुझ्या कणरुपी अस्तित्वाला शोधणार
तुला मी आता नवं आयुष्य देणार...................
अगं तु पण एक स्त्रीच आहेस
शब्दाच्या सौंदर्याने सजलेली रुपवती आहेस
तुझ्यातल्या त्या सौंदर्याला जो तो लुटु पाहणार
पण आता तुला मी अशरीर करणार
तुला मी ईथे स्वतंत्र वागवणार
मनातल्या भावनांना मी तरि कुठवर कैद ठेवणार
पण एक.......
तुला मी या बाजारात कधीच नाही विकणार
तुला मी आता नवं आयुष्य देणार...................
तुला मी आता नवं आयुष्य देणार...................
सचिन काकडे [जुलै ०८, २००७]