चाल : मिलिंद इंगळे यांच्या "गारवा" मधली कविता.
"डेवलपर" प्रेयसी आणि "टेस्टर" प्रियकर यांच्यातील संवाद:
त्याला कोडिंग आवडत नाही, पण तिला कोडिंग आवडतो......
"रिलीज" जवळ आल्यावर तो तिच्या तावडीत सापडतो.......
ती: मी तुला आवडते, पण माझा कोड आवडत नाही,
असलं तुझं गणित खरंच मला पटत नाही......
तो: कोड म्हणजे जिवाला घोर, कोड वैतागवाडी......
ती: कोड म्हणजे कल्पकता, कोड सोडवतं कोडी......
तो: कोड डोकं खराब करतं, कोड म्हणजे "syntax" चा जाच.......
ती: कोड हळूच गुपित सांगतं, "सगळी उत्तरं माहीत आहेत मलाच".....
दर वर्षी रिलीज येते, दर वर्षी असं होतं.....
दर वर्षी रिलीज येते, दर वर्षी असं होतं.....
कोड वरून भांडण होऊन, टीम मध्ये हस होतं.
कोड आवडत नसला, तरी ती त्याला आवडते,
कोड सकट आवडावी ती, म्हणून तीही झगडते.....
रुसून मग ती निघून जाते, डोकं खुपसून घेते तिच्या कोडात.......
त्याचं तिचं भांडण असं, ऐन रिलीज च्या गोंधळात........
(टीप: मनोगत वर काही लिहिण्याची ही पाहिलीच वेळ आहे. आणि मी मूळची बंगाली असल्यामुळे, मराठी भाषेतील चुका कृपया माफ कराव्यात . धन्यवाद..... )