भरली भेंडी

  • कोवळी लहान भेंडी - साधारण १/२ किलो
  • बेसन,शेंगदाण्याचा कूट
  • तिखट,मीठ,साखर,गोडा मसाला
  • तेल ,मोहरी ,हिंग , हळद
  • कोथिंबीर
३० मिनिटे
साधारण ४-५ माणसे

१.प्रथम भेंड्या चांगलया धुवुन व कोरडया करुन घ्याव्या.

२‌‌. सर्व भेंड्याना उभी चिर द्यावी. दोन तुकडे करु नये.

३. कढईत तेल गरम करुन त्यात बेसन व दाण्याचा कूट खमंग भाजुन घ्यावे.

४. यामध्ये मग चवीप्रमाणे मीठ, तिखट,गोडा मसाला,कोथिंबीर व चिमुटभर साखर घालावी.

५. हे भाजलेले मिश्रण सगळ्या भेंड्यामध्ये भरावे.

६.पुन्हा कढईत मोहरी,हळद व हिंग घालुन फ़ोडणी करावी.

७‌. यात सगळ्या भेंड्या परतुन साधारण १५-२० मिनीटे शिजवून घ्याव्या.

भेंड्या कोवळ्या व छोट्या असायला हव्या तरच भाजीची चव चांगली लागते.

आई.