१.प्रथम भेंड्या चांगलया धुवुन व कोरडया करुन घ्याव्या.
२. सर्व भेंड्याना उभी चिर द्यावी. दोन तुकडे करु नये.
३. कढईत तेल गरम करुन त्यात बेसन व दाण्याचा कूट खमंग भाजुन घ्यावे.
४. यामध्ये मग चवीप्रमाणे मीठ, तिखट,गोडा मसाला,कोथिंबीर व चिमुटभर साखर घालावी.
५. हे भाजलेले मिश्रण सगळ्या भेंड्यामध्ये भरावे.
६.पुन्हा कढईत मोहरी,हळद व हिंग घालुन फ़ोडणी करावी.
७. यात सगळ्या भेंड्या परतुन साधारण १५-२० मिनीटे शिजवून घ्याव्या.
भेंड्या कोवळ्या व छोट्या असायला हव्या तरच भाजीची चव चांगली लागते.
आई.
निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरण
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.