नको रे, शब्दांशी खेळणे आता नको
कवितेचे रसहीन चिपाड आता नको..
विडंबनाला फुकाचा खुराक आता नको..
इथे राज आहे साहित्यसम्राटांचे
लागू तयांच्या नादी आता नको..
शब्दांवरी मारूस त्यांच्या, मुला
फुकटचे हे डल्ले तू आता नको..
तुला दुसरे काहीच येत नसले तरी.......
असा खोडसाळा लावूस तू
त्यांच्या साहित्याला नाट आता नको..