लिहिणे तर सोपे असते
पण मी ते अवघड करतो
तो लगक्रम सरळच असतो
का घोळामध्ये शिरतो?...
जर साध्या साध्या गोष्टी
मज आधी पटल्या असत्या;
मी सावध झालो असतो
अन चुका वगळल्या असत्या...
मी मनाप्रमाणे माझ्या
का वृत्तच बदलत जातो
अन विचका झाल्यानंतर
मग मी गद्यावर येतो...
लिहिणे तर सोपे असते
पण मी ते अवघड करतो
हे कसे कुणाला सांगू-
मी टीकेला घाबरतो...
अजब ह्यांच्या भीती वर आधारित