आमची प्रेरणा - चक्रपाणि यांनी कोजागिरीच्या शुभमुहूर्तावर प्रकाशित केलेली चित्रमय, औचित्यपूर्ण गझल/कविता पौर्णिमा.
लाजरी भासत जरी आहे समोरी पौर्णिमा
काय सांगू, ती खरी आहे टपोरी पौर्णिमा
चिंब हिरवळ, रात मखमल, प्रेममय वातावरण
मारते पण भाव नाकेली, मुजोरी पौर्णिमा
साबणाचा वास तो घरभर पसरला, लाडके
तुंबलेली साफ कर ती त्वरित मोरी, पौर्णिमा !
राखरांगोळी तुझी मी आज करते राजसा
पाहसी शेजारची तू का छचोरी पौर्णिमा ?
बघ तिला, कोजागिरीला टॅन होऊ पाहते
राहते हल्ली जराशी पाठकोरी पौर्णिमा