अजून चंद्र तोच आहे
अजून रात्र स्तब्ध आहे
लिहून काढ आता जरा
हिशोब तुझा चांदण्यांचा
धवल वस्त्र नेसून आता
राहू नकोस थिजलेली
लिहून काढ आता जरा
हिशोब गोठल्या अश्रूंचा
तसाच वारा सुटला आहे ..
आहेत उभ्या फांद्या अजून
लिहून काढ आता जरा
हिशोब गळलेल्या पानांचा
आता अजून थांबशील तर
विसरून जाशील तू सखे..
फलून येईल वसंत अन्
जागतील पुन्हा स्वप्ने
मग काय साजरा करशील?
-सोहळा मुक्या शब्दांचा?