असतेच जुने काहीसे
लपलेले प्रत्येकात
पण शोध नव्याचा चाले
प्रत्येकाच्या हृदयात!!
दाटून नजारे येती
संध्यासमयीचे जेव्हा
आतले जुने काहीसे
गलबलून जाते तेव्हा!!
एकांत क्षणी कुठल्याशा
येतेच जुने सामोरे
सावरणे अवघड होते
सुटतात असे कंगोरे
टाकून जुन्याला द्यावे
तर अशक्य होते जगणे
अन कवटाळावे त्याला
तर एकाकी धगधगणे
हा आयुष्याचा गुंता
सोडविल्याने सुटतो का?
अन पीळ आतला कधिही
जाळला तरी तुटतो का?
म्हणुनीच नव्याचा शोध
प्रत्येकाच्या नजरेत
आतल्या जुन्याचे आणि
सोहळे उभ्या दुनियेत!!!