चंद्र सजल्या राती

चंद्र सजल्या राती
झाडांची हिरवी पाती
तेजाने उजळून जाती

चंद्र सजल्या राती
आकाशी लुकलुक तारा
हलकेच वाहतो वारा

चंद्र सजल्या राती
उतरल्या चांदण्या वेली
आकाशच वरती खाली

चंद्र सजल्या राती
हे तरू जणू बैरागी
अन निरव शांतता जागी

चंद्र सजल्या राती..