ह्या वर्षी उन्हाळा अगदीच काही असह्य नव्हता. एप्रिल महिन्यात आलेली एक लाट सोडली तर बाकी दिवस जरा बरे गेलेत. मागच्या महिन्यात जेव्हा थोडासा पावसाचा शिडकावा झाला तेव्हा आलेला एक अनुभव तुमच्या बरोबर शेअर करावासा वाटला.
चार पाच दिवसच उकाड्या नंतर पडलेला पावूस थोडा सुखावून गेला. त्यादीवशी संध्याकाळी आकाश गुलाबी शेंदरी रंगाने नटले होते. एका बिल्डिंगच्या परिसरातील छोटी मुले आपला खेळ थांबवून आकाशाचा तो विलोभनीय रंग पाहण्यात रमून गेली होती. मुलांचे वय असेल ४ ते ५ वर्षांचे! इतक्यात एक छोटा धावत आला. आकाशाचा रंग पाहून म्हणाला, "अरे ते बघा आकाशात सगळीकडे रक्त सांडले आहे! " इतकी घाणेरडी उपमा का बरे सुचली एव्हढ्याशा मुलाला. टीव्ही आणि सिनेमातला रक्तपात पाहून असेल का झालेला हा परिणाम. तुमचे काय मत आहे? ऐकायला आवडेल मला.