गौतम ऋषींकडे तीन सारख्या आकाराची गवताची कुरणे होती. त्या तिन्ही कुरणांत गवताचे प्रमाण आणि वाढीचा वेग अगदी सारखा होता. पहिल्या कुरणातले सगळे गवत (शेवटच्या पात्यापर्यंत) संपवायला सत्तर गायींना चोवीस दिवस लागतात. दुसऱ्या कुरणातले सगळे गवत (शे.पा.) संपवायला तीस गायींना साठ दिवस लागतात. तिसऱ्या कुरणातले सगळे गवत (शे.पा.) जर शहाण्णव दिवसांत संपवायचे असेल, तर किती गायी लागतील?
टीपः प्रश्न कापून ठेवलेल्या गवताच्या भाऱ्यांचा नसून जमिनीत मुळे रुजलेल्या आणि वाढणाऱ्या गवताचा आहे. त्यामुळे (७० गुणिले २४) आणि (३० गुणिले ६०) ह्या दोन्ही संख्या जुळत का नाहीत असा प्रश्न पडू नये!